“अहंकाराने त्यांनी गुजरातची दोन गाढवं म्हटलं होतं पण…”

मुंबई | उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीच्या (Assembly Election 2022) पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी आज एएनआय या वृत्तसंस्थेला सविस्तर मुलाखत दिली. यावेळी बोलताना त्यांनी विविध विषयांवर भाष्य केलं आहे.

मोदींनी यावेळी बोलताना उत्तर प्रदेश निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अखिलेश यादव आणि जयंत चौधरी यांच्यावर हल्लाबोल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जोरदार टीका केली आहे.

आम्ही दोन मुलांचा खेळ याआधी पाहिला होता, त्यांच्यात एवढा अहंकार आला की त्यांनी गुजरातची दोन गाढवं असा शब्द वापरला. पण उत्तर प्रदेशने त्यांना धडा शिकवला, असं नरेंद्र मोदींनी यावेळी म्हटलं.

निवडणूक जाहीर झाल्यानंतर मी कुठल्याही राज्याचा दौरा करु शकलो नाही. कारण निवडणूक आयोगाने काही मर्यादा आखून दिल्या. मात्र व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे मी काही ठिकाणी जनतेला संबोधित केलं. आम्ही नेहमी जनतेच्या सेवेत असतो. सरकारमध्ये असतो तेव्हा तर अधिक तीव्रतेनं, अधिक विस्ताराने, ‘सबका साथ, सबका विकास’ हा मूलमंत्र घेऊन काम करतो, असंही ते म्हणालेत.

भाजप निवडणुकीत पराभूत होत होतच विजयी ठरली आहे. आम्ही अनेक पराभव पाहिले. अनामत रक्कम जप्त होतानाहि पाली. एक वेळ असा होता की आमचे जनसंघाचे नेते पराभवानंतरही मिठाई वाटत होते. तेव्हा मला वाटलं की हे तर पराभूत झाले आहेत आणि मिठाई का वाटत आहे. तर तेव्हा आम्ही विचारलं की पराभवानंतरही मिठाई का वाटत आहात. त्यावेळी सांगितलं गेलं की आमच्या तीन उमेदवारांची अनामत रक्कम वाचली होती. अशा काळ आम्ही पाहिला आहे, असंही मोदींनी यावेळी सांगितलं.

‘मी सर्व राज्यात पाहतो आहे की, भाजप मोठा विजय प्राप्त करेल. भाजपला सर्व पाच राज्यात सेवा करण्याची संधी जनता देईल. ज्या राज्यात सेवा करण्याची संधी मिळाली तेथील जनतेलं आम्हाला जोखलं आहे. मी समजतो की आपल्या देशात वेळ बदलला पण टर्मिनॉलॉजी बदलली नाही. कारण यापूर्वीची सरकारं फक्त फाईलवर स्वाक्षरी करणं, निवडणुका लक्षात ठेवून योजनांची घोषणा आणि भूमिपूजन करुन येणं, इतकंच काम करत होती. त्यांना असं वाटत होतं की घोषणा केली आता काय. लोकांना काम दिसत नाही आणि केवळ घोषणा दिसतात तेव्हा अॅन्टी इन्क्मबन्सी येते. पण सरकारचा प्रयत्न दिसत असेल, योजनांची अंमलबजावणी दिसते तिथे सरकार विरोधी वातावरण दिसत नाही. भाजपशासित राज्यात प्रो इन्क्मबन्सी पाहायला मिळते, असा विश्वासही नरेंद्र मोदींनी व्यक्त केला आहे.

महत्वाच्या बातम्या- 

मोठी बातमी! अनिल देशमुखांच्या अडचणीत वाढ, सचिन वाझेचा खळबळजनक दावा

“मुंबईचा दादा आम्हीच म्हणणाऱ्यांचा माज मुंबईकरच उतरवतील” 

ती गोष्ट माझी पाठ सोडत नाहीये; पॅानस्टार मिया खलिफाचा धक्कादायक खुलासा 

“मुंबईचा दादा शिवसेना पण ती फक्त मातोश्रीपुरतीच” 

भाजपला सर्व पाच राज्यात सेवा करण्याची संधी जनता देईल- नरेंद्र मोदी