“शरद पवारांच्या हिंमतीने मुंबईला अंडरवर्ल्ड पासून वाचवलं”; मोदींचा तो व्हिडीओ व्हायरल

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक (Nawab Malik) यांना मनी लॉड्रिंग प्रकरणात अटक झाल्यापासून अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम याचं नाव सतत चर्चेत आलं आहे.

दरम्यान मलिक हे मुस्लिम असल्याने त्यांच नाव दाऊदशी जोडलं जात असल्याचं वक्तव्य शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं होतं.

जप नेते माजी खासदार निलेश राणे (Nilesh Rane) यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष खासदार शरद पवारांचे संबंध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमशी जोडले होते.

शरद पवारच दाऊदचा माणूस आहे का? मला संशय येतो की शरद पवारच महाराष्ट्रात दाऊदचा माणूस आहेत. खरंच संशय येतो, असं वक्तव्य केलं होत. अशात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे.

सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये नरेंद्र मोदी शरद पवार यांचं कौतुक करताना दिसत आहे. शरद पवारांच्या हिंमतीने आणि कौशल्याने मुंबईला अंडरवर्ल्ड पासून वाचवलं होतं, असं वक्तव्य नरेंद्र मोदींनी केलं आह.

शरद पवारांनी मुंबईला अंडरवर्ल्ड पासून वाचवलं, असं वक्तव्य मोदी यांनी केलं होत त्यामुळे आता शरद पवारांना अंडरवर्ल्डशी जोडणाऱ्या भाजप नेत्यांना पंतप्रधानांनीच उत्तर दिलं असल्याचं राष्ट्रवादीचे (NCP) कार्यकर्ते म्हणत आहेत.

गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनीही नरेंद्र मोदींचा हा व्हिडीओ शेअर करत भाजप नेत्यांवर निशाणा साधला आहे.

अंडरवर्ल्ड आणि शरद पवारांबद्दल पंतप्रधान मोदीजीकाय बोलत आहेत? ज्यांना समजेल त्यांनी वाचावं बाकीच्यांनी बक बक चालू ठेवावी, असं म्हणत आव्हाडांनी भाजपला सुनावलं आहे.

 

 

 

महत्वाच्या बातम्या- 

AAP ची आता ममता बॅनर्जी यांच्याशी टक्कर; घेतला ‘हा’ मोठा निर्णय 

“…तर नोटीसप्रमाणे महाविकास आघाडीलाही जाळल्याशिवाय राहणार नाही” 

पोस्टाची भन्नाट योजना; तुमचे पैसे होतील दुप्पट

मोठी बातमी! झेलेन्स्की यांनी पुतिन यांच्यासमोर ठेवला ‘तो’ प्रस्ताव

“उद्धव ठाकरेंना लाज वाटली पाहिजे, बाळासाहेबांचं नाव लावताना”