नवी दिल्ली | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आज देशाला संबोधित केलं आहे. कोरोनासारखं संकट कधीही पाहिलं नाही, हे अभूतपूर्व संकट आहे, मात्र पराभव मनुष्याला मान्य नाही, सतर्क राहून, नियमांचं पालन करुन अशा युद्धाचा सामना करायचा आहे, असं नरेंद्र मोदी म्हणाले आहेत.
21 वं शतक हे भारताचं आहे हे आपण ऐकत आलो आहे, कोरोना संकटकाळातही जगभरात जी परिस्थिती आहे ते अभूतपूर्व आहे, मात्र 21 वं शतक हे भारताचं असावं हे केवळ स्वप्न नको तर जबाबदारीही हवी, असं नरेंद्र मोदींनी म्हटलं आहे.
भारतात पीपीई किट किंवा N95 मास्क बनत नव्हते, मात्र आता 2-2 लाखांचं उत्पादन होत आहे, हे संकटामुळे शक्य झालं. आपण स्वावलंबी होऊ शकलो, असं मोदींनी सांगितलं आहे.
दरम्यान, स्वावलंबी भारत हेच ध्येय, हाच मार्ग आहे, इतकी मोठी आपत्ती भारतासाठी एक संधी घेऊन आली आहे, असंही मोदींनी सांगितलं आहे.
महत्वाच्या बातम्या-
-पुण्यात ‘या’ वयोगटातील 80 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू
-योगी सरकारचा तब्बल 16 लाख कर्मचाऱ्यांना झटका; घेतला ‘हा’ निर्णय
-राज्यातील मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी; आता घरपोच दारु मिळणार, पण…
-‘तुमचा भाऊ म्हणून सदैव सोबत’; जयंत पाटलांचं नर्सना भावनिक पत्र