“राष्ट्रपती निवडणुकीनंतर नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करतील”

मुंबई | राष्ट्रपतिपदाची निवडणूक झाल्यानंतर मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी महाराष्ट्रातील सरकार बरखास्त करतील, असं मत भाजपचे प्रदेश उपाध्यक्ष सुरेश हाळवणकर यांनी व्यक्त केलं आहे.

नरेंद्र मोदी यांच्या सरकारला आठ वर्ष पूर्ण झाल्याबद्दल भाजपच्या वतीने रविवारी भावे नाट्यमंदिरात कार्यकर्ता मेळावा पार पडला. यावेळी ते बोलत होते.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे न बोलता कार्यक्रम करण्यात पटाईत आहेत. राज्यसभा निवडणुकीत महाविकास आघाडीचा कार्यक्रम पक्का होता. केवळ मुख्यमंत्रिपदासाठीच जनादेश डावलून तीन पक्ष एकत्र आले आहेत. ठाकरेंनी दगाबाजी केली आहे. त्याचा फटका त्यांना राज्यसभा निवडणुकीत दिला आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

येणाऱ्या विधान परिषद निवडणुकीत त्याची पुनरावृत्ती होईल. त्यानंतर राष्ट्रपती निवडणूक झाल्यावर राज्यातील सरकार मोदी बरखास्त करतील, असा दावा हाळवणकर यांनी केला आहे.

येणारा काळ भाजपचा आहे. त्याची सुरुवात राज्यसभेच्या विजयापासून झालेली आहे. 2024 मध्ये उद्धव ठाकरे यांचे मावळे कावळे होऊन उडून गेले असतील. भाजप हा सर्वात मोठा पक्ष होऊन स्वबळावर राज्यात सत्ता स्थापन करेल, असंही त्या म्हणाल्यात.

महत्त्वाच्या बातम्या- 

टेंशन वाढलं! राज्यातील कोरोना रूग्णसंख्येत पुन्हा वाढ, वाचा आजची आकडेवारी 

पंतप्रधान मोदींच्या देहू दौऱ्यामुळे ‘हे’ महत्त्वाचे मार्ग राहणार बंद, वाचा सविस्तर

“घर मे बैठा नकली, अयोध्या जा रहा है असली”

“राहुल बाबा पूछताछ से रोता है क्या, आगे आगे देखो होता है क्या”

डॉ. प्रकाश आमटेंची कॅन्सरशी झुंज; तब्येतीबाबत ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर