देशात शांतता आणि एकता गरजेची आहे- पंतप्रधान

नवी दिल्ली | आपल्यासाठी पहिल्यांदा देश नंतर पक्ष आहे, असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पार्लमेंट लायब्ररीच्या इमारतीत आयोजित करण्यात आलेल्या भाजपाच्या संसदीय दलाच्या बैठकीत मोदी बोलत होते. यावेळी ते भावूक झाल्याचं पाहायला मिळालं.

पंतप्रधान मोदींनी यावेळी थेट उल्लेख न करता दिल्ली हिंसाचारावरही भाष्य केलं. देशात शांतता आणि एकता गरजेची आहे, असं मोदी यावेळी म्हणाले आहेत. तसेच त्यांनी शांततेचं आवाहन केलं आहे.

आपला ‘सबका साथ सबका विकास’ या धोरणाचा पुनरुच्चार करताना ‘सबका विश्वास’ही गरजेचा असल्याचे मोदी यावेळी म्हणाले आहेत. देश हा कधीही पक्षापेक्षा मोठा असला पाहिजे, असंही ते यावेळी म्हणाले आहेत.

पंतप्रधान मोदींनी काल ट्विट करुन आपण सोशल मीडिया सोडत असल्याचे संकेत दिले आहेत. त्यांनतर आज बोलताना त्यांनी दिल्ली हिंसाचाराबाबत भाष्य केलं. त्यांनी यासंबंधी 26 फेब्रुवारी रोजी पहिल्यांदा ट्वीट केलं होतं.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री आणि जयंत पाटलांच्या वक्तव्याने मुस्लिम आरक्षण जाहीर करणाऱ्या नवाब मलिकांची गोची!

-मुस्लिम आरक्षणावर आमच्यात आणखी चर्चा झाली नाही; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं मोठं वक्तव्य

-माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सर्वोच्च न्यायालयाचा मोठा झटका!

-“संपादकपदी रश्मी ठाकरे म्हणून सामनाची भाषा बदलणार नाही, संपादकीय राऊतांकडेच”

-‘नवबौद्ध, 6 डिसेंबरला फुकट मुंबई दर्शनास येतात’; आक्षेपार्ह पोस्टप्रकरणी केतकी चितळेविरोधात तक्रार दाखल