इस्रोच्या मदतीला नासा धावली; ‘विक्रम लँडर’शी संपर्क साधण्यासाठी मदतीचा हात

नवी दिल्ली | चंद्राच्या पृष्ठभागापासून अवघ्या 2 किलोमीटरच्या अंतरावर असताना ‘विक्रम लँडर’शी संपर्क तुटला तो अद्यापही झालेला नाही. इस्रो चंद्रावर असलेल्या विक्रमशी संपर्क साधण्यासाठी रात्रंदिवस प्रयत्न करत आहे. तर दुसरीकडे अमेरिकीची अंतराळ संशोधन संस्था नासानेही विक्रमशी संपर्क साधण्यासाठी ‘हेलो’ मेसेज पाठवला आहे.

नासाने डीप स्पेस नेटवर्कच्या जेट प्रपल्शन लेबोरेटरीमधून विक्रम लँडरला रेडियो संदेश पाठवला. नासाच्या सूत्रांनुसार, इस्रोच्या सहमतीनंतर विक्रम लँडरशी संपर्क करण्यासाठी रेडिओ संदेश पाठवला आहे.

नासाने कॅलिफोर्निया येथील DSN च्या माध्यमातून विक्रमला रेडियो संदेश पाठवला आहे, असं एका अंतराळ वैज्ञानिकाने सांगितलं. DSN ने 12 किलोवॅटची रेडियो फ्रिक्वेंसीच्या माध्यमातून विक्रमशी संपर्क करण्याच्या प्रयत्न केला आहे. लँडरला सिग्नल पाठवल्यानंतर चंद्र एक रेडियो रिफ्लेक्टरसारखं काम करतो आणि सिग्नलचा छोटासा भाग पृथ्वीवर पाठवतो. असेही त्यांनी सांगितलं.

नासा भारताच्या या महत्त्वाकांक्षी अशा चंद्र मोहिमेत जातीने लक्ष घालतो आहे. यामागे नासाचा स्वार्थ आहे. पहिलं कारण म्हणजे, विक्रमवर पॅसिव्ह पेलोड लेजर रिफ्लेक्टर लागलेले आहेत, यामुळे लँडरची अचूक जागा आणि पृथ्वी ते चंद्राचं अचूक अंतर कळू शकतं.

दरम्यान, पृथ्वी ते चंद्राचं अंतर माहित झाल्यावर ते नासाला भविष्यातील त्यांच्या योजनेसाठी महत्त्वाचं ठरु शकतं. पण, लँडर विक्रमच्या चंद्रावरील हार्ड लँडिंगमुळे नासाच्या या आशेवर पाणी फिरलं आहे.

महत्वाच्या बातम्या-