नवी मुंबई निवडणुकीपूर्वी फडणवीसांना धक्का… शिवसेनेसाठी गुडन्युज!

नवी मुंबई | नवी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक अगदी तोंडावर आहे. याच काळात भाजपला मोठा धक्का बसला आहे. 4 भाजप नगरसेवकांनी निवडणुकीच्या तोंडावर शिवसेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याचं कळतंय. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या उपस्थितीत चारही नगरसेवक आपल्या मनगटावर शिवबंधन बांधणार असल्याची माहिती आहे.

नवी मुंबई महापालिकेची निवडणूक अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलीये. सर्वच पक्षांनी निवडणुकीची मोर्चे बांधणी जोरदार सुरू केलेली आहे. अशातच 4 भाजप नगरसेवकांनी शिवसेना प्रवेशाचा घेतलेला निर्णय भाजपला नक्कीच मोठा धक्का मानण्यात येतोय.

तुर्भेतील भाजपच्या चार नगरसेवकांनी काही दिवसांपूर्वी राजीनामे दिले होते. महापालिका आयुक्त अण्णा मिसाळ यांच्याकडे राजीनामे सुपूर्द केल्यानंतर भाजपला गळती लागल्याची चर्चा होती. काहीच दिवसांपूर्वी महाविकास आघाडीने नवी मुंबईत निवडणूक डोळ्यासमोर ठेऊन मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं.

दरम्यान, स्थायी समितीचे माजी सभापती सुरेश कुलकर्णी, त्यांच्या पत्नी नगरसेविका राधा कुलकर्णी, संगीता वास्के आणि मुद्रिका गवळी यांनी राजीनामा देण्यापूर्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची वर्षा शासकीय निवासस्थानी भेट घेतली होती.

महत्त्वाच्या बातम्या-

-आतापर्यंत या 2 व्यक्तींसाठीच मी माझ्या खिशातल्या पैशांनी हार विकत घेतलाय- गडकरी

-छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचा इतिहास दाखवाच कारण…- राणुआक्का

-ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

-कम्युनिस्ट पक्षाच्या ‘या’ नेत्याची नितीन गडकरी पुजा करायचे!

-देवेंद्र फडणवीस-अजित पवारांच्या ‘त्या’ शपथविधीवर नितीन गडकरींची बॅटींग!