आतापर्यंत या 2 व्यक्तींसाठीच मी माझ्या खिशातल्या पैशांनी हार विकत घेतलाय- गडकरी

मुंबई |   नेत्याने आपल्याला ओळखावं किंवा काहीतरी पद द्यावं, यासाठी अनेक कार्यकर्ते आपल्या नेत्याच्या पाठीमागे धावत असतात. मग नेत्याच्या वाढदिवसाला कटआऊट लावणं असो किंवा मग त्याच्या स्वागतासाठी पुष्पहार आणणं असो. मात्र अशा गोष्टी मी माझ्या जीवनात कधीही केल्या नाहीत, असं भाजपचे ज्येष्ठ नेते मंत्री नितीन गडकरी म्हणाले.

मी आयुष्यात माझा बायोडाटा कुणाला दिला नाही. मी कुणाचा कटआऊट लावला नाही आणि पुष्पगुच्छ घेऊन कुणाच्या स्वागताला विमानतळावर गेलो नाही. मी आतापर्यंत अटल बिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर या दोघांसाठीच एकदा माझ्या स्वत:च्या खिशातल्या पैशांनी हार विकत घेतला होता, असं गडकरींनी यावेळी आवर्जुन सांगितलं.

एबीपी माझाच्या माझा महाराष्ट्र माझं व्हिजन या कार्यक्रमात बोलताना त्यांनी पुढच्या 5 वर्षांतलं महाराष्ट्राचं व्हिजन, आता महाराष्ट्र नेमका कोणत्या स्थितीत दिसतो? आणि महाराष्ट्रासाठी गडकरींचं व्हिजन, या अनेक मुद्द्यांवर त्यांनी भाष्य केलं. यावेळी त्यांनी त्यांच्या खास शैलीत स्वपक्षातील, मित्रपक्षातील तसंच विरोधकांना त्याचबरोबर कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना चिमटे काढले.

यावेळी बोलताना नितीन गडकरी म्हणाले-

मी आयुष्यात माझा बायोडाटा कुणाला दिला नाही. मी कुणाचा कटआऊट लावला नाही आणि पुष्पगुच्छ घेऊन कुणाच्या स्वागताला विमानतळावर गेलो नाही. मी अटल बिहारी वाजपेयी आणि लता मंगेशकर या दोघांसाठीच आत्तापर्यंत माझ्या स्वत:च्या खिशातल्या पैशांनी हार विकत घेतलाय, असं गडकरींनी यावेळी आवर्जुन सांगितलंय. मी आहे तसा आहे… पटलं त्याच्याबरोबर… नाही पटलं त्याच्याशिवाय…. आपण आपलं काम करत राहिलं पाहिजे.. मी कुठलं पदं समोर ठेऊन काम नाही केलं.

गडकरींनी यावेळी राजकीय महत्वकांक्षेपोटी सतत या पक्षातून त्या पक्षात जाणाऱ्या पुढाऱ्यांना देखील नेहमीप्रमाणे ठणकावलं. पक्षांतरं करणाऱ्या नेत्यांना पक्षनिष्ठा कशी असली पाहिजे याचं उदाहरण देताना भारतीय कम्युनिस्ट पक्षाचे ज्येष्ठ नेते, कुशल संघटक कॉ. ए. बी. बर्धन यांची आठवण जागी केली.

कॉ. ए. बी. बर्धन कम्युनिस्ट होते. त्यांच्या विचारांशी ते पक्के होते. म्हणून मी त्यांची पुजा करायचो. त्यांच्याकडे आदराने जायचो. त्यांचा नेहमी सन्मान करायचो. कारण त्यांनी त्यांच्या विचारसरणीशी कधी तडजोड केली नाही. ते त्यांच्या विचारांशी पक्के होते, असं म्हणत त्यांच्यासारखी पक्षनिष्ठा ठेवायला हवी असं गडकरी म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-छत्रपती संभाजी महाराजांच्या अटकेनंतरचा इतिहास दाखवाच कारण…- राणुआक्का

-ठाकरे सरकारने शेतकऱ्यांचा विश्वासघात केलाय; देवेंद्र फडणवीसांचा घणाघात

-कम्युनिस्ट पक्षाच्या ‘या’ नेत्याची नितीन गडकरी पुजा करायचे!

-देवेंद्र फडणवीस-अजित पवारांच्या ‘त्या’ शपथविधीवर नितीन गडकरींची बॅटींग!

-विहिरीत जीव देईन पण कधी काँग्रेसमध्ये जाणार नाही- नितीन गडकरी