नवी मुंबई महानगरपालिकेत भाजपला धक्का; शिवसेना अन् राष्ट्रवादीत इनकमिंग होणार?

नवी मुंबई |  नवी मुंबई महानगरपालिकेत गणेश नाईक आणि पर्यायाने भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी गणेश नाईक यांच्यासोबत भाजपमध्ये प्रवेश केलेले 11 नगरसेवक भाजपला रामराम ठोकण्याची  शक्यता आहे.

नवी मुंबई महानगरपालिकेतील 6 नगरसेवकांनी आज उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेतली आहे. त्यामुळे गणेश नाईक यांचे समर्थक राष्ट्रवादीत पुन्हा परतण्याची शक्यता आहे.

भाजपला रामराम ठोकू इच्छिणाऱ्या 11 नगरसेवकांपैकी 6 नगरसेवक राष्ट्रवादीत तर 5 नगरसेवक शिवसेनेत प्रवेश करू शकतात, अशी माहिती समोर येत आहे.

दरम्यान, गेल्याच आठवड्यात महाविकास आघाडीने नवी मुंबईत मोठं शक्तीप्रदर्शन केलं होतं. शिवसेना-काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या सगळ्या दिग्गज नेत्यांनी या शक्तीप्रदर्शनात आपला सहभाग नोंदवला होता. याचवेळी गणेश नाईकांचं नवी मुंबईतलं राजकीय वर्चस्व आता संपणार असल्याचं अजित पवार म्हणाले होते.

महत्त्वाच्या बातम्या-

-आमचे पूर्वज हिंदूच होते मग आम्ही नागरिकत्वाचा दाखला का द्यावा?; सय्यदभाईंचा सरकारला सवाल

-पाच दिवसांचा आठवडा करण्याचा निर्णय म्हणजे सरकारचा मुर्खपणा; काँग्रेस नेत्याचं टीकास्त्र