रवी राणा यांना भेटताच नवनीत राणांना अश्रू अनावर, 12 दिवसांनंतर पती-पत्नीची भेट

मुंबई | अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना राजद्रोहाच्या आरोपाखाली अटक करण्यात आली होती. राणा दांपत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे खासगी निवासस्थान मातोश्री बाहेर हनुमान चालीसा पठणाचा आग्रह धरला होता.

बारा दिवसांनंतर नवनीत राणा आणि रवी राणा यांना जामीन मंजूर केला आहे. नवनीत राणा यांना मानेचा त्रास होत असल्याने लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

रवी राणा यांना पाहिल्यानंतर नवनीत राणा यांना अश्रू अनावर झाले. रवी राणांनी नवनीत राणा यांना आधार देतानाचे भावनिक चित्र पाहायला मिळाले.

तळोजा जेलमधून बाहेर पडल्यानंतर रवी राणा यांनी नवनीत राणांची भेट घेतली आहे. रवी राणा यांनी तळोजा जेल प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत.

तळोजा जेलमधून सुटका झाल्यानंतर रवी राणा पत्नीच्या भेटीला पोहोचले होते. यावेळी भाजप नेते किरीट सोमय्या देखील रवी राणा यांच्यासोबत होते.

जेलमध्ये असताना नवनीत राणा यांना स्पॉन्डॅलिसिसचा त्रास जाणवत होता. रूग्णालयात जाण्यासाठी नवनीत राणा यांनी तुरूंग प्रशासनाकडे वारंवार विनंती केली होती.

तुरूंगात सुटका झाल्यानंतर नवनीत राणा यांना लिलावती रूग्णालयात दाखल करण्यात आले होते. नवनीत राणा यांच्यावर उपचार सुरू ठेवायचे की, डिस्चार्ज द्यायचा यासंदर्भातील निर्णय अहवाल आल्यानंतर घेतला जाणार आहे.

दरम्यान, 12 दिवसांच्या जेलवारीनंतर पती पत्नीची भेट झाली. यावेळी नवनीत राणांना अश्रू अनावर झाले होते. त्यावेळी रवी राणा यांनी आधार देण्याचा प्रयत्न केला.

पाहा व्हिडीओ- 

महत्त्वाच्या बातम्या- 

‘भीमा कोरेगांव हिंसाचार प्रकरणात फडणवीस सरकार जबाबदार’, शरद पवारांचा गंभीर आरोप

…म्हणून तुरुंगातून बाहेर येताच नवनीत राणा लिलावती रूग्णालयात दाखल

“राज ठाकरेंना अयोध्येत येऊ देणार नाही”; भाजप खासदार आक्रमक

“काय अल्टिमेटम द्यायचा तो घरातल्यांना द्या”; अजित पवारांनी राज ठाकरेंना फटकारलं

मोदी सरकारचा आणखी एक मोठा निर्णय, एअर इंडियानंतर ‘ही’ कंपनीही विकली