“…तर मीही अण्णा हजारेंसोबत उपोषणाला बसेल”

अमरावती | किराणा दुकानांतून वाईन विक्रीला परवानगी देण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयाच्या विरोधात ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे (Anna Hazare) यांनी उपोषणाचं अस्त्र उगारलं आहे.

येत्या 14 फेब्रुवारीपासून राळेगणसिद्धी येथे ते उपोषणाला बसण्याचा इशारा दिला आहे. राज्य सरकारला दुसरे समरण पत्र पाठवून त्यांनी तारीख जाहीर केली आहे.

तुमच्या या निर्णयाने मी दु:खी झालो आहे. त्यामुळे मला तुमच्या राज्यात जगायची इच्छा राहिली नाही, असे हताश उद्गार अण्णा हजारे यांनी काढलं आहे. तसेच उद्यापासून अमरण उपोषण करणार असल्याचं अण्णांनी सांगितलं आहे.

तुम्ही जनतेचे सेवक आहात. मालक नाही. त्यामुळे तुम्ही जनतेची परवानगी घेऊनच निर्णय घेतला पाहिजे. तुम्ही मनमानी कशी करू शकता?, असा सवाल अण्णा हजारे यांनी ठाकरे सरकारला केला आहे.

वाईनही आपली संस्कृती नाही. आपल्या राज्यात दारुची दुकानं कमी आहेत का? तरीही किराणा आणि सुपरमार्केटमध्ये वाईन का ठेवता? तुम्हाला तरुण पिढीला व्यसनाधीन करायचं आहे का?, असा सवाल देखील अण्णांनी सरकारला विचारलाय.

अण्णांपाठोपाठ आता अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी देखील अण्णा हजारे यांना पाठींबा देत त्यांच्या सोबत वाईन विक्रीच्या विरोधात उपोषणाला बसणार असल्याची माहिती त्यांनी दिलीये.

किराणा दुकानात वाईन मुळे येणारी पिढी व महिलांचे भविष्य खराब होईल त्यामुळे सरकारने हा निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी नवनीत राणा यांनी केली.

महत्वाच्या बातम्या-

“सरकार गेल्यापासून देवेंद्र फडणवीस फ्रस्ट्रेशनमध्ये”

“नाना तू उद्या सागरवर येऊन दाखव, पाहतो तू कसा परत जातो”

  Jayprabha Studio: “आमचं चुकलं असेल तर मी राजकीय संन्यास घेईन”

  येत्या 24 तासांत ‘या’ भागात विजांच्या कडकडाटासह जोरदार पावसाची शक्यता

  “मी वाघाचा मुलगा आहे, नरेंद्र मोदींना सत्तेतून हाकलून देईन”