मुंबई | पोलीस कोठडी सुनावण्यात आलेल्या अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी तुरुंग अधिकाऱ्यांवर जातीवादाचा आरोप केला आहे. याप्रकरणी त्यांनी लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र (Letter) लिहिल्याचं कळतंय.
ज्यामध्ये त्याने आपण खालच्या जातीतील असल्याचं सांगत पिण्याचं पाणी दिलं जात नसल्याचा आरोप केला आहे. नवनीत राणा सध्या भायखळा महिला कारागृहात आहेत.
राणा यांनी तुरुंगातील पोलिसांवर गंभीर आरोप केलेत. मी खालच्या जातीतली आहे, असं सांगत मला पाणी दिलं गेलं नाही. यानंतर मला रात्री बाथरूम वापरायचं असताना पोलिस कर्मचाऱ्यांनी माझ्या मागणीकडे लक्ष दिलं नाही, असं त्यांनी सांगितलंय.
मला पुन्हा घाणेरड्या भाषेत शिवीगाळ करण्यात आली. आमच्यासारख्या खालच्या जातीच्या लोकांना त्यांचं बाथरूम वापरू देत नाही असंही ते म्हणाल्याचं राणा यांनी सांगितलं आहे.
मला पूर्ण विश्वास आहे की उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील शिवसेना आपल्या हिंदुत्वाच्या तत्त्वांपासून पूर्णपणे विचलित झाली आहे कारण त्यांना सार्वजनिक जनादेशाचा विश्वासघात करून काँग्रेस-राष्ट्रवादीसोबत निवडणूक लढवायची होती, असंही त्यांनी पत्रात म्हटलंय.
दरम्यान, राणा दाम्पत्याला शनिवारी अटक करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं निवासस्थान असलेल्या ‘मातोश्री’बाहेर हनुमान चालिसाचं पठण करणार असल्याचं म्हणत त्यांनी खळबळ उडवून दिली होती.
यानंतर शिवसेनेचे कार्यकर्ते संतप्त झाले आणि त्यांनी नवनीक राणा यांच्या घराबाहेर निदर्शने केली होती. यानंतर राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली.
महत्त्वाच्या बातम्या-
किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर देवेंद्र फडणवीसांचे गंभीर आरोप, म्हणाले…
‘राष्ट्रपती राजवट लावायची असेल तर…’; संजय राऊतांचा हल्लाबोल
‘राष्ट्रपती राजवट लागू करा…लै मजा येईल…’; राष्ट्रवादीच्या नेत्याचं खळबळजनक ट्विट
येत्या पाच दिवसांत ‘या’ भागांत जोरदार पावसाची शक्यता, वाचा हवामान खात्याचा अंदाज
“भाजप नाच्या पोरांसारखा त्या बाईच्या इशाऱ्यावर नाचतो, हे….”