“नवनीत राणांनी D गँगशी संबंधित…”; संजय राऊतांंचा मोठा गौप्यस्फोट

मुंबई | आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याचा निर्णय घेतल्यानंतर मुंबईत मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं. शिवसैनिकांनी आक्रमक भूमिका घेत राणा दाम्पत्यांना आंदोलन मागे घेण्यास भाग पाडलं.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेत राणा दाम्पत्यांवर टीका केली होती. त्यानंतर रवी राणा यांनी संजय राऊत यांच्याविरूद्ध पोलिसात तक्रार दिली होती.

अशातच आता संजय राऊतांनी ट्विट करत गंभीर आरोप केले आहेत. ईडीने अटक केलेल्या युसुफ लकडवालाकडून नवनीत राणांनी 80 लाखांचे कर्ज घेतल्याचा आरोप संजय राऊत यांनी केले आहेत.

युसुफ लकडवालाचा जेलमध्ये मृत्यू झाला. त्याला ईडीने मनी लाँड्रिंगच्या आरोपाखाली अटक केली होती, असा धक्कादायक खुलासा संजय राऊत केला आहे.

युसुफ लकडवाला याचे डी गँगशी संबंध होते. त्याची ईडीने चौकशी केली होती. मग या प्रकरणाची ईडी चौकशी करणार का? हा राष्ट्रीय सुरक्षेचा मुद्दा नाही का?, असा सवाल राऊतांनी विचारला आहे.

दरम्यान, संजय राऊतांनी पंतप्रधान ऑफिसला आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना टॅग केलं आहे. त्याचबरोबर त्यांनी पुराव्याचे फोटो देखील शेअर केले आहेत.

पाहा ट्विट-


महत्त्वाच्या बातम्या- 

“मी प्रांजळपणे कबुल करते की…”, सुप्रिया सुळे यांचं मोठं वक्तव्य

आत्ताची मोठी बातमी! तब्बल 18 दिवसानंतर गुणरत्न सदावर्ते जेलबाहेर, सुटकेनंतर म्हणाले…

Elon Musk ट्विटरचे नवे मालक झाल्यानंतर CEO पराग अग्रवालने दिला ‘हा’ गंभीर इशारा

“मी दहावीत दोनदा नापास झालो पण…”, नागराज मंजुळेंची पोस्ट चर्चेत

अनिल देशमुखांना दिलासा मिळणार?, चांदीवाल आयोगाचा अहवाल मुख्यमंत्र्यांकडे सादर