मुख्यमंत्र्यांचा राजीनामा हा महाराष्ट्रातील जनतेचा विजय- नवाब मलिक

मुंबई | राज्यामधील सत्तास्थापनेचा घोडेबाजार थांबवण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने निर्णय देत देवेंद्र फडणवीस यांना उद्याच बहुमत चाचणी घेण्याचे आदेश दिले. मात्र बहुमत नसल्याचा अंदाज आला आणि त्यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला. हा महाराष्ट्रातील 11 कोटी जनतेचा विजय आहे, असं राष्ट्रवादीने काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी म्हटलं आहे.

कोणत्याही मार्गाने सत्ता हस्तगत करायची भाजपची भूमिका होती. मात्र हा मणिपूर, गोवा किंवा कर्नाटक नाही, हा छत्रपतींचा महाराष्ट्र आहे, हे भाजप विसरली होती. भाजपच्या नेत्यांमध्ये असलेला अहंकार महाराष्ट्राने संपवला असल्याची टीका नवाब मलिक यांनी केली आहे.

दुसरीकडे अजित पवार यांच्या पाठिंब्याने आम्ही शपथ घेतली होती. परंतू काही कारणास्तव मी सरकारमध्ये राहू शकत नाही, असं अजित पवार यांनी सांगितल्यावर आमच्याकडे बहुमत नसल्याने आता मी देखील मुख्यमंत्रीरदाचा राजीनामा दिला आहे, असं फडणवीसांनी स्पष्ट केलं आहे.

दरम्यान, तीनचाकी सरकार माझ्या शुभेच्छा त्यांनी राज्याचा गाडा चांगल्या प्रकारे हाकावा, अशा शब्दात फडणवीसांनी नव्या सरकारला शुभेच्छा दिल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-