“लगा था चुल्हा जलाने की बात करेंगे लेकिन उन्होंने दिया जलाने को कहा”

मुंबई |  प्रथमत: टाळी आणि थाळ्या वाजवायला सांगितल्यानंतर आता मेणबत्ती, दिवा किंवा मोबाईलची टॉर्च लाईट जाळायल्या सांगणाऱ्या पंतप्रधान मोदींच्या आवाहनानंतर आता विविध प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी शेलक्या शब्दात मोदींवर निशाणा साधला आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज सकाळी देशवासियांना उद्देशून केलेल्या भाषणातून सर्वसामान्य लोकांची घोर निराशा झाली आहे. लगा था चुल्हा जलाने की बात करेंगे लेकिन उन्होंने दिया जलाने को कहा, अशा शेलक्या शब्दात त्यांनी मोदींवर टीकास्त्र सोडलं आहे.

दुसरीकडे कोरोनाने बेरोजगार झालेल्या कामगारांना काहीतरी दिलासा देणारा निर्णय पंतप्रधान घोषित करतील. पण ‘थाळी टाळी आणि दीपावली’ शिवाय त्यांच्याकडे काहीच नाही, असंं अतुल लोंढे यांनी म्हटलं आहे. तर कोरोनाला परतवून लावण्यासाठी पंतप्रधान मोदी काहीतरी ठोस पाऊल उचलतील परंतू पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांच्या हाताल निराशा आलेली आहे. जनता सरकारने घालून दिलेल्या सगळ्या नियमांचं पालन करत आहे मात्र सरकार कोरोनापासून जनतेचं रक्षण करण्यात पूर्णपणे अपयशी ठरते आहे, असं काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार राजीव सातव म्हणाले आहेत.

दरम्यान, येत्या रविवारी 5 एप्रिल रोजी रात्री 9 वाजता  घरातल्या सगळ्या लाईट बंद करा आणि घराच्या दरावाजासमोर किंवा बाल्कनीत उभा राहून 9 मिनिटे मेणबत्ती किंवा मोबाईल फ्लॅशलाईट जाळा. यावेळी रस्ते, मोहल्ला किंवा घराबाहेर गर्दी टाळा आणि सोशल डिस्टन्सिंगची लक्ष्मण रेषा ओलांडू नका, असा नवा उपक्रम मोदींनी सुचवला आहे.

 

महत्वाच्या बातम्या –

-दिव्याच्या माध्यमातून देशाला कोरोनाविरोधात एकत्र आणण्याचा पंतप्रधानांचा हेतू असावा- रोहीत पवार

-पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली खेळाडूंशी मन की बात

-5 एप्रिलला मला तुमची 9 मिनिटे द्या, पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भाषणातील 9 मुद्दे

-कोरोनामुळं शिख धर्मगुरुच्या मृत्यूनं खळबळ; क्वारंटाईन असताना गावोगावी केली प्रवचनं

-कोरोनाला रोखण्यासाठी मोदींचा मास्टर प्लॅन; सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दिल्या ‘या’ महत्त्वाच्या सूचना