“…त्यावेळी महाराष्ट्रात परिवर्तन निश्चितच होईल”

मुंबई : गेल्या अनेक दिवसांपासून उस्तुकता लागलेल्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम घोषित झाला आहे. निवडणुकीच्या तारखांची घोषणा झाल्यानंतर राष्ट्रवादीचे राष्ट्रीय प्रवक्ते आणि मुंबई अध्यक्ष नवाब मलिक यांनी प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना नवाब मलिक यांनी भाजप-शिवसेनेवर जोरदार टीकास्त्र सोडलं.

गेल्या सहा महिन्यात आर्थिक मंदीचे संकट वाढलं आहे. बेरोजगारी वाढली आहे, शेतकरी अडचणीत आले आहेत. आत्महत्या वाढल्या आहेत. एकंदरीत जनता हे सरकार बदलले पाहिजे, परिवर्तन झाले पाहिजे या मानसिकतेत आहे, असं नवाब मलिक यांनी म्हटलं.

विधानसभा निवडणुका झाल्यानंतर 24 तारखेला निकाल येईल त्यावेळी महाराष्ट्रात परिवर्तन निश्चित होणार, असा विश्वास नवाब मलिक यांनी व्यक्त केला आहे.

अपेक्षेप्रमाणे निवडणूक आयोगाने 21 ऑक्टोबर ही मतदानाची तारीख जाहीर केली आहे. आम्हीही तयारीला लागलो आहोत. आम्हाला अपेक्षा होती की, 20 – 21 ऑक्टोबरला निवडणूका होतील, असं मलिक यांनी सांगितलं.

दरम्यान, ज्यापध्दतीने घटनेमध्ये तरतुद आहे. त्याप्रमाणे निवडणूक आयोगाने निवडणूका चांगल्या वातावरणात पार पडाव्यात असं सांगितले आहे. त्या होतील याची अपेक्षा निवडणूक आयोगाकडून करतो, असेही नवाब मलिक म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-