सेनेचं चव्हाणांशी बोलणं झालं असेल पण राष्ट्रवादीशी बोलणं काही झालं नव्हतं”

मुंबई | शिवसेनेने 2014 साली झालेल्या निवडणुकीत भाजपला रोखण्यासाठी काँग्रेस -राष्ट्रवादीला  सत्तास्थापनेचा प्रस्ताव दिला होता. यावर राष्ट्रवादीचे नेेते आणि मंत्री नवाब मलिक यांनी मोठं वक्तव्य केलं आहे.

काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितल्याप्रमाणे 2014 साली शिवसेनेनं काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची सरकार बनवण्यासाठी त्यांची बोलणी झाली होती. मात्र त्यांच्या पक्षाची बोलणी झाली असेल पण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाशी कुठल्याही प्रकारची बोलणी झाली नव्हती. हीच सत्य परिस्थिती असल्याचं, नवाब मलिकांनी सांगितलं आहे.

भाजपला रोखण्यासाठी आघाडी सरकार स्थापन करण्याच्या दृष्टीने त्यावेळी शिवसेना आणि राष्ट्रवादीने माझ्याकडे संपर्क साधला होता. मात्र तातडीने मी हा प्रस्ताव फेटळला होता, असंही पृथ्वीराज चव्हाण यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, नवाब मलिकांच्या वक्तव्यावरून काँग्रेस आणि राष्ट्रवादी पक्षांमध्ये दुमत असल्याचं समोर आलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-गडकरी ज्या कामाला हात लावतात ते सहज पुर्ण होतं- नाना पाटेकर

-“जे माझ्या नशिबात होतं. ते मी भोगलं, शेवटी काहीही झालं तरी नियती इमानदारीच्या सोबत असते”

-“गेल्या सहा वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या 2 हजार 838 लोकांना भारतीय नागरिकत्व”

-नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हा – नितीन गडकरी

-पराभवामुळे चंद्रकांत खैरे काहीही बरळतात- रावसाहेब दानवे