शिक्षणमंत्र्यांच्या या चांगल्या निर्णयाने शिक्षकांनी सोडला सुटकेचा निश्वास! म्हणाल्या मी स्वत: शिक्षिका… मला व्यथा माहितीयेत!

मुंबई |  राज्यातील अनेक शिक्षकांना अशैक्षणिक कामं करावी लागतात. हीच कामं आता आम्ही टप्प्याटप्प्याने बंद करणार आहोत, असं मोठं आश्वासन राज्याच्या शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी दिलं आहे. शिक्षणमंत्र्यांच्या या आश्वासनानंतर शिक्षकांमध्ये आनंदाचं वातावरण आहे.

जहाजांच्या कप्तानाकडून आपण गुणवत्तेची अपेक्षा करतो. परंतू त्यांना 250 अशैक्षणिक कामांत गुंतवून ठेवण्यात येते. खरं तर शिक्षण सोडून त्यांना हीच कामे करावी लागतात. त्यामुळे आपण ही कामे टप्प्याटप्प्याने बंद करणार आहोत, असं त्या म्हणाल्या आहेत.

बृहन्मुंबई उच्च व उच्च माध्यमिक शाळा मुख्याध्यापक संघटनेचा एक कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. मी स्वत: शिक्षिका आहे. मला शिक्षकांच्या समस्या माहितीयेत. त्यामुळे तातडीने आम्ही या प्रश्नावर काम करणार आहोत, अशीही ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

दरम्यान, शिक्षणमंत्र्यांच्या प्रस्तावित निर्णयाने साहजिकच शिक्षकांच्या अपेक्षा वाढल्या आहेत. अशाच धडाकेबाज निर्णयांची अपेक्षा शिक्षक आणि विद्यार्थ्यांना शिक्षणमंत्र्यांकडून असणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-“हिंदू म्हणून घ्यायचं नसेल त्यांनी खुशाल दुसऱ्या देशात निघून जावं”

-गडकरी ज्या कामाला हात लावतात ते सहज पुर्ण होतं- नाना पाटेकर

-“जे माझ्या नशिबात होतं. ते मी भोगलं, शेवटी काहीही झालं तरी नियती इमानदारीच्या सोबत असते”

-“गेल्या सहा वर्षात पाकिस्तानमधून आलेल्या 2 हजार 838 लोकांना भारतीय नागरिकत्व”

-नोकरी मागणाऱ्यांपेक्षा नोकरी देणारे व्हा – नितीन गडकरी