‘रियाचं ड्र.ग्ज कनेक्शन दह.शतवादी गटापर्यंत आहे’; NCB प्रमुख राकेश अस्थाना यांचा दावा

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूत प्रकरणाला आत्तापर्यंत अनेक वेगवेगळी वळणं मिळाली आहेत. सुशांत प्रकरणात अं.मली पदार्थांचा संबंध आढळल्यापासून ना.र्कोटिक्स कंट्रोल ब्युरो याप्रकरणी तपास करत ताहे. सुशांतची एक्स गर्लफ्रेंड रिया चक्रवर्ती सुरुवातीपासूनच याप्रकरणी वा.दाच्या घेऱ्यात सापडली आहे. एनसीबीला अं.मली पदार्थ प्रकरणी रिया चक्रवर्ती विरोधी पु.रावे मिळाल्यानं एनसीबीनं रियाला अ.टक केली आहे. अशातच आता एनसीबी प्रमुख राकेश अस्थाना यांनी याप्रकरणी एका मासिकाशी बोलताना रिया विषयी महत्वाची माहिती दिली आहे.

‘रिया चक्रवर्तीचं ड्र.ग्ज रॅकेट खूप मोठं आहे. अं.मली पदार्थ प्रकरणात एका मोठ्या ड्र.ग्ज रॅकेटबाबत माहिती मिळाली आहे. या ड्र.ग्ज रॅकेटचं कनेक्शन दुबई पासून दह.शतवादी गटापर्यंत जोडलेलं आहे,’ अशी माहिती राकेश अस्थाना यांनी दिली आहे.

‘तसेच पार्ट्यांसाठी ड्र.ग्ज आणले जात होते आणि ड्र.ग्जच्या येणाऱ्या पैशांचा उपयोग ना.र्को टे.ररसाठी केला जात होता. रियानं चौकशी दरम्यान सांगितल्या प्रमाणे सुशांत सिंह राजपूत क्यु.रेटेड मारि.युआ.ना हे ड्र.ग्ज घेत होता. क्यु.रेटेड मारि.युआ.ना या ड्र.ग्जची बाजारात किंमत 8 लाख रुपये प्रतिकिलो इतकी आहे,’ असंही अस्थाना यांनी सांगितलं आहे.

‘अं.मली पदार्थ प्रकरणात रिया चक्रवर्तीच्या सहभागाविषयी मी एवढंच सांगेल की रियासारख्या लोकांना माफ करू शकत नाही. हे लोक अनेक तरुणांसाठी एका रोल मॉडेल प्रमाणे असतात. तसेच बॉलीवूड मधील अनेक ड्र.ग्ज पार्ट्यांविषयी आम्हाला माहिती मिळाली आहे. याबाबत सर्व ठोस पु.रावे मिळाल्यानंतरच आम्ही पुढील का.रवाई करू,’ असंही राकेश अस्थाना यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, अं.मली पदार्थ प्रकरणी रिया चक्रवर्तीनं एनसीबीच्या चौकशी दरम्यान इंडस्ट्रीतील 25 ‘ए’ लिस्टर्स सेलेब्रिटीची नावे उघड केली आहेत. सध्या रिया मुंबईतील भायखळा तु.रुंगात न्यायालयानं सुनावलेली 14 दिवसांच्या को.ठडीची शिक्षा भोगत आहे.

एनसीबीनं रिया चक्रवर्तीसह रियाचा भाऊ शौविक चक्रवर्ती यालाही याप्रकरणी ता.ब्यात घेतलं आहे. तसेच याप्रकरणी आता एनसीबीच्या तपासात बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि नम्रता शिरोडकर यांचीही नाव समोर आली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतसिंग प्रकरणाला मोठं वळण; शरीरात सापडली ‘ही’ अत्यंत धक्कादायक गोष्ट

परिणीती चोप्रानं ‘या’ कारणामुळं सुशांतसह काम करण्यास नकार दिला होता; अनुराग कश्यपचा मोठा खुलासा

सुशांतच्या मृ.त्यूचं गूढ उकलणार? सीबीआयसोबत एम्सच्या टीमची महत्वपूर्ण बैठक

अनुराग कश्यपवर बला.त्काराचा आ.रोप झाल्यानंतर अनुरागच्या दोन्ही पूर्व पत्नींनी सोडलं मौन म्हणाल्या…

सुशांत ड्र.ग्जचे हेवी डोस का घेवू लागला होता? रियानं केला धक्कादायक खुलासा!