नवी दिल्ली | अभिनेता सुशांत सिंग राजपूत मृत्यू प्रकरणात रोज नवे खुलासे होत आहे. कंगना राणावतने नेपोटीजमपासून केलेली सुरवात आता झगमगत्या बॉलिवूडमधील ड्र.ग्ज कनेक्शनपर्यंत येऊन थांबले आहे. आतापर्यंत बॉलिवूडच्या अनेक दिग्गज कलाकारांचे नावे पुढे येत आहे. त्यात एनसीबीच्या तपासात आता बॉलिवूडची अभिनेत्री दीपिका पदुकोण आणि नम्रता शिरोडकर यांचे नाव समोर आले आहे.
सुशांतच्या प्रकरणात याआधीही एनसीबीच्या तपासात अनेक प्रसिद्ध बॉलिवूड कलाकारांची नावे पुढे आली आहेत. यात श्रद्धा कपूर, रकुल प्रीत सिंह आणि सारा अली खान यांची नावे आहे. आता त्यात बॉलिवूडची प्रसिद्ध अभिनेत्री अभिनेत्री दीपिका पदुकोणचेही नाव तपासात समोर आले आहे.
एनसीबीच्या तपासात जया शहा यांची मॅनेजर करिष्मासोबत दीपिका पदुकोणचे बोलणे झाले होते. त्याचे व्हाट्स अॅप चॅट समोर आले आहे. जया शहा या सुशांत सिंहच्या मॅनेजर होत्या. एनसीबीने काल जया यांची चौकशी केली.
जया यांच्या व्हाट्स अॅप चॅटमध्ये श्रद्धा कपूर यांचे नाव आले होते, त्या जयाला सीबीडी ऑयल मागत होत्या. या प्रकरणाचा तपास करणाऱ्या एनसीबीच्या अधिकाऱ्याने सांगितले की, या तपासात बॉलिवूड अभिनेत्री दीपिका पदुकोणचे नाव समोर आले आहे. जया शहा यांनी मॅनेजर करिष्मासोबत दीपिका पदुकोण व्हाट्स अॅप चॅटद्वारे बोलताना आढळल्या आहे.
या व्यतिरिक्त व्हाट्स अॅप चॅटमध्ये नम्रता शिरोडकर यांचेही नाव समोर आले आहे. माहितीनुसार यात एक एन नावपासून सुरवात होणारी अभिनेत्री ड्र.ग्जबाबत विचारत होती. त्यात लिहिलंय, तुम्ही मला वचन दिले होते की, मला एमडी बॉम्बेमध्ये द्याल आणि आपण सोबत पार्टी करू. तेव्हा त्यात अभिनेत्रीने उत्तर दिले, मला खरंच विश्रांतीची गरज आहे.
यावर जया शहा म्हणाल्या, तुम्ही मला एक पेडलर बनवत आहात, पण तरीही मी तुमची आज्ञा ऐकते. एनसीबी अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार जया शहा आणि करिष्मा यांच्यात ड्र.ग्जबाबत काही व्हाट्स अॅप चॅट मिळाले आहे. जया शहा यांची क्वीन कंपनी आहे. या कंपनीसोबत अनेक बॉलिवूडच्या दिग्गज आणि प्रसिद्ध कलाकारांचे कॉन्ट्रॅक्ट आहे.
जया शहा यांच्या मोबाईल डेटा रिट्राईव्ह केला, यात बॉलिवूड कलाकार त्यांना सीबीडी ऑयल आणि ड्र.ग्जबाबत विचारत होते. यातुन बॉलिवूडच्या ड्र.ग्ज कार्टलविषयी महत्त्वाची माहिती मिळण्याची शक्यता आहे. जया शहा ईडीच्या चौकशीला उत्तर देताना म्हणाल्या, आम्ही कधीच सीबीडी ऑयलसारखे काहीच सप्लाय केले नाही.
जया यांच्या माहितीनुसार सुशांत सिंहने त्यांना कॉन्ट्रॅक्ट दिले होते, तेव्हा ते डिप्रेशनमध्ये होते. यामुळे जया यांनी सुशांतला चहा आणि कॉफीसोबत सीबीडी ऑयल घेण्याचे सांगितले होते, त्यामुळे त्यांना आराम मिळेल. त्याचबरोबर जया म्हणाल्या की, मी सुशांतला सुचवलेले ऑयल पूर्णपणे कायदेशीर आहे आणि हे विविध शॉपिंग मॉलमध्येही सहज मिळते.
महत्त्वाच्या बातम्या-
‘क-क कंगना करणाऱ्या राज्य सरकारनं माझा नाद सोडला तर…’; कंगनानं राज्य सरकारला पुन्हा डिवचलं
‘रियाचं ड्र.ग्ज कनेक्शन दह.शतवादी गटापर्यंत आहे’; NCB प्रमुख राकेश अस्थाना यांचा दावा
सुशांतसिंग प्रकरणाला मोठं वळण; शरीरात सापडली ‘ही’ अत्यंत धक्कादायक गोष्ट
परिणीती चोप्रानं ‘या’ कारणामुळं सुशांतसह काम करण्यास नकार दिला होता; अनुराग कश्यपचा मोठा खुलासा