“पवारांचं वय, अनुभव पाहता पडळकर हे डासाएवढेही नाहीत”

मुंबई | शरद पवारांचं वय, अनुभव अन् राजकीय कारकीर्द पाहता पडळकर हे डासाएवढेही नाहीत अशी टीका राष्ट्रवादीचे नेते आणि माजी आमदार अनिल गोटे यांनी केली आहे. अनिल गोटे यांनी एक पत्रक जारी केलं असून त्यातून त्यांनी पडळकरांच्या टीकेवर भाष्य केलंय.

पडळकरांचा राजकारणातील अनुभव फारच तोकडा आहे. पडळकरांनी शरद पवारांना कोरोनाची उपमा दिली यावरुन त्यांची राजकीय पात्रता आणि विचारांची पातळी लक्षात येते, अशी टीका गोटेंनी केली आहे.

पडळकरांना भाजपच्या धोकेबाजीचा झटका बसेल तेव्हाच शुद्धीवर येतील असा टोलाही अनिल गोटेंनी गोपीचंद पडळकरांना लगावला आहे.

अनिल गोटेंनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल केला आहे. यावेळी त्यांनी मी कधी फडणवीस ‘महाराष्ट्राच्या राजकारणाला लागलेला महारोग असं म्हणणार नाही, असं अनिल गोटे म्हणाले आहेत.

 

-ठाकरे सरकार भक्कम आहे, विरोधकांना मुर्खांच्या नंदनवनात राहू द्या- शरद पवार

-उद्योगधंद्यांवर लॉकडाऊनचा मोठा परिणाम; पुण्यात कामगारांचा तुटवडा