राष्ट्रवादी काँग्रेसचं विदर्भातील एकमेव दुकान बंद होईल; नाना पटोले यांचं मोठं विधान

मुंबई | राज्यात शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या तीन पक्षांच सरकार आहे. मात्र, महाविकास आघाडीमध्ये कुरबूर सुरू असल्याचं पाहायला मिळत आहे. आता काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

पंढरपूरची जागा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील दुकान बंद होत असेल तर बुलढाण्यातील एकमेव दुकान बंद व्हायला वेळ लागणार नाही, असं म्हणत नाना पटोले यांनी राष्ट्रवादी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

राष्ट्रवादी काँग्रेसचं विदर्भात दुकानही नाही त्यामुळे ते दुकान बंद होईल असंही म्हणता येणार नाही, असं वक्तव्य नाना पटोले यांनी केलं आहे. नाना पटोले यांच्या राष्ट्रवादीकडून वक्तव्यानंतर निदर्शन करण्यात आली आहेत.

पंढरपुरची जागा जयंत पाटलांना जिंकता आलेली नाही, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे. पत्रकारांनी राष्ट्रवादीचं एकच दुकान विदर्भात आहे असं वक्तव्य तुम्ही केलं होतं, असे विचारले असता राष्ट्रवादीचं दुकान विदर्भात नाही हे अनेकदा विदर्भाच्या जनतेने सांगितलेलं आहे, असं नाना पटोले म्हणाले आहेत. त्यामुळे दुकान आहे हे म्हणणं चुकीचं आहे, असं नाना पटाेले यांनी म्हटलं आहे.

मी मित्रापासून सावध राहा असं म्हटलं होतं, ही भाषा आमच्या लोकांना कळाली तुम्हाला नाही कळणार. तसेच विदर्भात राष्ट्रवादीला फारसे महत्व नाही, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

रविवारी नाना पटोले यांनी अमरावती हिंसाचारावर देखील भाष्य केलं आहे. इतर राज्यात निवडणुका जिंकण्यासाठी महाराष्ट्राला बदनाम करून निवडणुका जिंकल्या जातात. त्रिपुरा राज्यात घडलेल्या घटनेचे पडसाद महाराष्ट्रात उमटत आहेत, अशी टीका नाना पटोले यांनी केली आहे.

त्रिपुरा राज्यात घडलेल्या पडसाद महाराष्ट्रात घडत आहेत. हा भाजपचा जुना प्रयत्न असल्याचं नाना पटोले यांनी म्हटलं आहे. मात्र, आता हिंदु- मुस्लिम या जाळ्यात येणार नाही, असं नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

भाजपची महाराष्ट्रातून पहाटेचं सरकार गेलं त्यामुळे ते रात्री स्वप्न न बघता दिवसा बघतात, असा टोलाही नाना पटोले यांनी लगावला आहे.

महाराष्ट्रात झालेला अलायन्स हा त्यांना पटू शकत नाही. त्यामुळे ते सरकार अस्थिर करण्याचा वारंवार प्रयत्न करत आहेत. हिंदू मुस्लिम वादाचा वापर करून सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत असतील तर जनता त्यांना भीक घालणार नाही, असंही नाना पटोले यांनी म्हटलं आहे.

आम्ही केंद्र सरकारच्या धोरणाविरोधात आंदोलन सुरू केलेलं आहे. देशात महागाईने उच्चांक गाठला आहे. भूकमारी आहे, शेतकरी आत्महत्या वाढल्या संविधान धोक्यात आलं आहे, असं म्हणत नाना पटोले यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-  

ईडी आणि सीबीआय प्रमुखांच्या कार्यकाळाबाबत मोदी सरकारची मोठी घोषणा

“कंगणा जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचं”

“खरंच हिंदू खतरे में है तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा” 

“…तर मुंबईत हिंदू जिवंत नसता, आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार बोलणार नाहीत का?” 

“गाईचं शेण अन् गोमुत्रामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते आणि …”