पद्मविभूषण बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती चिंताजनक

पुणे | उभ्या महाराष्ट्राला आपल्या शाहिरीच्या माध्यमातून शिव इतिहासाचा परिचय करून देणारे बाबासाहेब पुरंदरे आधुनिक महाराष्ट्रातील ज्येष्ठ इतिहासकार आहेत.

छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाला जगासमोर आणण्यात बाबासाहेबांची भूमिका फार महत्त्वाची आहे. त्यांनी अत्यंत सुरेखपणे इतिहासाला उजळणी दिली आहे.

शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांची प्रकृती गेल्या काही दिवसांपासून बरी नाही. त्यामुळे त्यांना कोथरुडच्या दीनानाथ रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.

गेल्या तीन दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. बाबासाहेबांनी वयाची शंभरी गाठली आहे. वार्धक्यामुळे ते उपचारालाही प्रतिसाद देत नसल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. डॉक्टरांची एक विशेष टीम त्यांच्यावर गेल्या तीन दिवसांपासून उपचार करत आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांनी मराठी साहित्य क्षेत्रात भरीव योगदान दिलं आहे. बाबासाहेब पुरंदरे लिखीत जाणता राजा नाटक महाराष्ट्रभर प्रचंड प्रसिद्ध आहे.

बाबासाहेब पुरंदरे यांनी काही महिन्यांपूर्वी वयाची शंभरी गाठली होती. त्यावेळी झालेल्या दोन ते तीन कार्यक्रमांना त्यांनी हजेरी लावली होती.

राज्यभरातून बाबासाहेबांच्या दिर्घायुष्यासाठी प्रार्थना करण्यात आली होती. राज्यातील विविध क्षेत्रातील मान्यवरांसह मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनीही घरी येऊन पुरंदरे यांना शुभेच्छा दिल्या होत्या.

दोन ती कार्यक्रम वगळता त्यांनी नंतर कोणत्याही सार्वजनिक कार्यक्रमाला हजेरी लावली नव्हती. दिवाळी निमित्त होणाऱ्या शस्त्रपूजन कार्यक्रमालाही ते हजर राहिले नव्हते. पहिल्यांदाच ते या कार्यक्रमाला हजर नव्हते.

बाबासाहेब पुरंदरे यांना महाराष्ट्र सरकारनं महाराष्ट्र भूषण पुरस्कारानं सन्मानित केलं आहे. बाबासाहेबांच्या शिवाजी महाराजांच्या इतिहासावरील योगदानासाठी त्यांना हा पुरस्कार देण्यात आला होता.

बाबासाहेबांच्या प्रकृतीवर सर्वजण लक्ष ठेऊन आहेत. बाबासाहेब पुरंदरे यांच्यावर डाॅक्टरांची एक विशेष टीम उपचार करत आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

हजारो कोटींची कमाई पण कर मात्र शुन्य; असं का?, वाचा सविस्तर

“कंगणा जे म्हणाली ते खरंय, मी समर्थन करतो त्या वक्तव्याचं”

“खरंच हिंदू खतरे में है तर मोहन भागवतांनी दिल्लीत मोर्चा काढावा” 

“…तर मुंबईत हिंदू जिवंत नसता, आता हिंदुहृदयसम्राटांचे वारसदार बोलणार नाहीत का?” 

“गाईचं शेण अन् गोमुत्रामुळे अर्थव्यवस्था मजबूत होते आणि …”