‘या’ मतदारसंघात अजूनही राष्ट्रवादीचा उमेदवार ठरेना!

पुणे : विधानसभा निवडणुकीसाठी आता जवळपास सर्वच पक्षांनी उमेदवारी जाहीर केली आहे. पण काही मतदारसंघातील उमेदवार जाहीर झालेले नाहीत. त्यामुळे इच्छुकांची धाकधूक वाढली आहे. अशाच एका मतदारसंघापैकी एक म्हणजे खडकवासला मतदारसंघ.

खडकवासला मतदारसंघात राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर देखील आहेत. तिकीट मिळाल्यास त्यांना भाजपचे आमदार भीमराव तापकीर यांचं आव्हान असेल. पण खडकवासल्यात राष्ट्रवादीचा मार्ग खडतर असल्याचं सांगितलं जातंय.

खडकवासला हा बारामती लोकसभा मतदारसंघात असलेला महत्त्वाचा विधानसभा मतदारसंघ आहे. या मतदारसंघात आता भाजप विजयी हॅटट्रिक साधण्यासाठी सज्ज झालाय. भाजपचा आमदार असलेल्या या मतदारसंघात राष्ट्रवादीचा झेंडा रोवण्यासाठी सध्या जोरदार प्रयत्न सुरू आहेत. पण, भाजपचे दोन वेळा आमदार असलेल्या भीमराव तापकीर यांचं आव्हान मोडून काढणं शक्य आहे हा? मोठा प्रश्न आहे. 

सध्या राष्ट्रवादीतून अनेक जण इच्छुक आहेत. त्यापैकीच एक नाव म्हणजे रूपाली चाकणकर…. त्या राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्ष आहेत. शिवाय मतदारसंघात देखील त्यांचा राबता चांगला आहे. त्यामुळे त्यांच्याकडे देखील उमेदवारीचे प्रबळ दावेदार म्हणून पाहिलं जातं. 

राष्ट्रवादीच्या अनेक उमेदवारांपैकी महापालिकेतील विरोधी पक्षनेते दिलीप बराटे, नगरसेवक सचिन दोडके आणि महिला प्रदेशाध्यक्ष रुपाली चाकणकर यांची नावं आघाडीवर आहेत. यावेळी महिला प्रदेशाध्यक्षपदाची धुरा खांद्यावर असल्याने निवडणूक लढवणार नसल्याचं चाकणकर म्हणतात. पण, दुसरीकडे पक्षश्रेष्ठीचा आग्रह झाल्यास ‘हम तैयार है’ असं देखील चाकणकर सांगतात. 

महत्वाच्या बातम्या-