भाजपचा पडद्याआड महाराष्ट्रात ऑपरेशन लोटस करण्याचा प्रयत्न सुरू आहे- शरद पवार

मुंबई  | भाजपने कर्नाटक, मध्यप्रदेश या राज्यांमध्ये ऑपरेशल लोटस राबवल. त्याप्रमाणे भाजप आता महाराष्ट्रातही ऑपरेशन लोटस करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीचे अध्यक्ष आणि महायुतीचे शिल्पकार शरद पवार यांनी केला आहे.

देवेंद्र फडणवीस हे त्यांच्या भाषणात सांगतात की सरकार पाडण्याचा आमचा विचार नाही. पण भाजप राज्यात पडद्याआड राहून आपरेशन लोटस करत असल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे.  CNN News 18 ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी हा आरोप केला आहे.

महाराष्ट्रात सध्या तीन पक्षांचं सरकार आहे. तिन्ही पक्षांमध्ये थोडेफार मतभेद जरूर आहेत पण आम्ही भाजपविरोधात एकत्र आलो आहोत. त्यामुळे आमच्या सरकारला धोका नाही, असं पवारांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आत्तापर्यंत अनेकदा आमचं सरकार पाडण्याचा तारखा ऐकल्या. सर्वात आधी मी मे महिन्यात हे सरकार पाडलं जाईल असंं म्हणत होते. त्यानंतर जुलैची मुदत देण्यात आली आणि आता ऑक्टोंबर महिन्याची तारीख देण्यात आली आहे मात्र आमचं सरकार हे पुर्णवेळ काम करणार असल्याचं पवारांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

जसं शरद पवारांचं वय वाढतंय तसा त्यांचा हिंदू धर्मावरचा रागही वाढताना दिसतोय- निलेश राणे

…म्हणून सुशांतच्या वडिलांनी रिया चक्रवर्तीविरोधात केला गुन्हा दाखल; तक्रारीमध्ये केले ‘हे’ धक्कादायक आरोप!

राम मंदिराच्या भूमीपूजनाचं निमंत्रण मिळालं तर जाणार का?; शरद पवार म्हणाले…

भाजप शिवसेना पुन्हा एकत्र येणार?, फडणवीसांनी जरा स्पष्टच सांगितलं; म्हणाले…

“पंतप्रधानांनी राम मंदिराच्या भूमिपूजनाला जाणं हे संविधानाच्या शपथेविरोधात”