“…तेव्हा दिल्लीतून सरकार पाडण्याचे प्रयत्न झाले”, मोठा गौप्यस्फोट

मुंबई | राज्यात सध्या महाविकास आघाडी सरकार आणि भाजपमध्ये जोरदार वाद रंगला आहे. अशातच राष्ट्रवादीचे नेते शशिकांत शिंदेंनी भाजपवर जोरदार टीका केली आहे.

कोरोना काळात केंद्र सरकार खासदारांचा विकास निधी बंद करत होतं तेव्हा महाविकास आघाडीनं आमदारांच्या निधीमध्ये वाढ केल्याचं शिंदे म्हणाले आहेत.

कोरोना काळात मोठ्या प्रमाणात राज्याला आर्थिक फटका बसत असताना राज्य सरकारनं जनतेच्या हिताची काम केली आहेत, असंही शिंदे म्हणाले आहेत.

शशिकांत शिंदेंनी भाजपवर टीका करताना कोरोना काळातील केंद्र सरकारच्या कामगिरीवर बोट ठेवलं आहे. परिणामी वाद वाढण्याची शक्यता आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गुजरातचा विकास करण्यावर लक्ष दिलं. मुंबईतील अनेक उद्योग गुजरातला नेण्यात आलं, अशी टीका शिंदेंनी केली आहे.

विरोधकांनी कितीही प्रयत्न केले तरी महाविकास आघाडी सरकार भक्कम आहे. निधी वाटपाचा विषय काढत आमच्यात फुट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका शिंदेंनी केली आहे.

कोरोना काळात विरोधकांनी दिल्लीला जाऊन सरकार पाडण्यासाठी प्रयत्न केले, असा गौप्यस्फोट देखील त्यांनी यावेळी केलाय. त्याच काळात महाविकास आघाडी सरकारनं जनतेची सेवा केली, असंही ते म्हणाले.

दरम्यान, सभागृहात विरोधी पक्षनेते फडणवीसांनी शिवसेना आणि काॅंग्रेसच्या आमदारांना कमी निधी मिळत असल्याचा मुद्दा उपस्थित केला होता. यावरही शिंदेंनी फडणवीसांना प्रत्युत्तर दिलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 काळजी घ्या…! पुढील 3 दिवस अंगाची लाहीलाही होणार, राज्याच्या ‘या’ भागात उष्णतेची लाट येणार

“…नंतर आमचा नाद करा”; पंकजा मुंडेंचं धनंजय मुंडेंना खुलं आव्हान

  नवाब मलिकांना दिलासा नाहीच; मुंबई उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ निर्णय 

  मोठी बातमी! हिजाब प्रकरणी उच्च न्यायालयानं दिला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

  मोठी बातमी! प्रवीण दरेकर यांच्यावर फसवणुकीचा गुन्हा दाखल