‘तुमचा भाऊ म्हणून सदैव सोबत’; जयंत पाटलांचं नर्सना भावनिक पत्र

मुंबई | आंतरराष्ट्रीय परिचारिका दिनाच्या निमित्ताने जगभरातील नर्सेसविषयी कृतज्ञता व्यक्त केली जात आहे. फक्त ‘कोरोना’सारख्या संकट काळातच नाही, तर कायमच निरपेक्ष वृत्तीने रुग्णसेवा-सुश्रुषा करणाऱ्या परिचारिकांचं ऋण यानिमित्ताने व्यक्त केलं जात आहे.

कोरोना युद्धात लढणारे सैनिक तुम्ही साऱ्या परिचारिका आहात, तुमचा भाऊ म्हणून सदैव तुमच्यासोबत राहणार, असं भावनिक पत्र जलसंपदामंत्री जयंत पाटील यांनी परिचारिकांना लिहिलं आहे.

जगात प्रत्येक व्यक्ती अर्थप्राप्तीसाठी काही काम करत असते, पण खूप कमी कामे अशी असतात जी नोकरी देखील असते आणि समाजाची सेवा देखील. परिचारिका म्हणुन नोकरी हा त्या सेवेचाच भाग आहे, असं जयंत पाटील म्हणाले आहेत.

तुमच्या मेहनतीमुळेच हे संपूर्ण जग Covid19 च्या या अत्यंत वाईट अशा काळातून बाहेर पडेल. या सार्‍या काळात तुम्ही तुमची आणि तुमच्या सर्व कुटुंबियांची जरुर काळजी घ्या. तुमचा भाऊ म्हणून मी तुमच्यासोबत आहे, असं जयंत पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-भाजपने ऐनवेळी उमेदवार बदलला; पंकजा मुंडेंच्या ‘या’ कट्टर समर्थकला विधानपरिषदेची उमेदवारी

-कौतुकास्पद! कर्ज काढून ‘या’ अभिनेत्याने कर्मचाऱ्यांना दिला पुढील सहा महिन्यांचा पगार

-लॉकडाउनमध्ये महाराष्ट्र पोलिसांनी वसूल केला ‘इतक्या’ कोटींचा दंड

-कर्ज फेडण्यासाठी अनिल अंबानी यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

-मुंबई-पुण्यातून रेल्वे कुठे आणि कधी सुटणार?; वाचा संपूर्ण माहिती