राष्ट्रवादीच्या ‘या’ आमदारांना आता खावी लागणार जेलची हवा!

रत्नागिरी |  शिवसेनेत असताना 2005 साली काढलेला मोर्चा आताचे राष्ट्रवादीचे आमदार संजय कदम यांच्या चांगलाच अंगलट आलाय. न्यायालयाच्या आदेशानुसार त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांची रवानगी रत्नागिरीच्या जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

2005 साली खेड येथे अतिवृष्टीत बाधित झालेल्या बाजारपेठेतल्या लोकांच्या प्रश्नांसाठी संजय कदम यांनी खेड तहसील कार्यालयावर मोर्चा काढला होता. तत्कालिन प्रांतधिकारी प्रविण गेडाम आणि कदम यांच्यात त्यावेळी जोरदार खडाजंगी झाली होती.

संतापलेल्या कदम यांनी गेडाम यांच्या कार्यालयाची तोडफोड केली होती. त्याचप्रकरणी गेडाम यांनी कदम यांची तक्रार खेड पोलिसांत दाखल केली होती. 

2015 मध्ये खेड दिवाणी न्यायालयाने कदम यांना 1 वर्ष सक्षम कारावास आणि दंड अशी शिक्षा सुनावली होती. त्याविरूद्ध कदम खेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयात गेले होते. परंतू खेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयानेसुद्धा खेड दिवाणी न्यायालयाचा निर्णय कायम ठेवला.

खेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या आदेशानुसार आता खेड पोलिसांनी ताब्यात घेतलंय. त्यांची रवानगी रत्नागिरीच्या जिल्हा कारागृहात करण्यात आली आहे.

दरम्यान, संजय कदम खेडच्या अतिरिक्त सत्र न्यायालयाच्या निर्णयाविरोधात आता मुंबई उच्च न्यायालयात जाणार आहेत.

महत्वाच्या बातम्या-

-राज ठाकरेंकडून काय धडा घेतला??? आदित्य ठाकरे म्हणतात…

-…अन् खासदार नवनीत राणांनी आपला पहिला पगार मुख्यमंत्र्यांना दिला!

-काँग्रेस म्हणजे जातीयता, घराणेशाही आणि भ्रष्टाचार- चंद्रकांत पाटील

पुढचा मुख्यमंत्री कोण हे मला काय विचारता?- राज ठाकरे

-अजित पवारांच्या वाढदिवशी बारामतीत ‘मुर्दाबाद’च्या घोषणा! पाहा व्हीडिओ-