राष्ट्रवादीला आणखी एक धक्का; ‘या’ विद्यमान आमदाराचा शिवसेनेत प्रवेश?

रायगड : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेसला बसणाऱ्या धक्क्यांची मालिका सुरुच आहे. राष्ट्रवादीचा आणखी एक आमदार पक्षाची साथ सोडण्याच्या तयारीत आहे. कर्जत खालापूरचे विद्यमान आमदार सुरेश लाड हे शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं बोललं जातंय.

सुरेश लाड हे सुनील तटकरे यांच्या सर्वात जवळचे सहकारी आहेत. सुरेश लाड हे शिवबंधन बांधून, आता शिवसेनेतून विधानसभा निवडणूक लढण्याचे संकेत आहेत.

सुनील तटकरे यांचा सख्खा पुतण्या अवधूत तटकरे यांनीही शिवसेनेत प्रवेश केला. त्यानंतर आता सुरेश लाड यांनीही सेनेत प्रवेश करण्याचा निर्णय घेतल्याने, तटकरेंसाठी आणि पर्यायाने राष्ट्रवादीला हे मोठे धक्के आहेत.

सुरेश लाड हे राष्ट्रवादीच्या तिकीटावर तीन वेळा आमदार म्हणून निवडून आले. 1999 मध्ये लाड कर्जत खालापूर विधानसभा मतदारसंघातून निवडून आले होते.

दरम्यान, 2004 मध्ये त्यांना पराभव स्वीकारावा लागला. त्यानंतर 2009 आणि 2014 मध्ये लाड पुन्हा निवडून आले.

महत्वाच्या बातम्या-