पक्षाची इच्छा लोकसभा लढवावी; पण बाबा विधानसभेवर ठाम!

सातारा : काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण हे उदयनराजे भोसले यांच्याविरोधात सातारा लोकसभा पोटनिवडणूक लढवतील, अशी चर्चा होती. मात्र पृथ्वीराज चव्हाण हे विधानसभा निवडणूकच लढवणार असल्याची माहिती आता समजत आहे.

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे चव्हाण यांच्या नावासाठी आग्रही होते. त्यानंतर आता पृथ्वीराज चव्हाण यांनी हायकमांडला आपला निर्णय कळवला असून ते कराड दक्षिण मतदारसंघातून विधानसभा निवडणूकच लढवतील, अशी माहिती मिळाली आहे. 

आता सातारा लोकसभेसाठी पोटनिवडणूक होणार आहे. या निवडणुकीत उदयनराजेंची कोंडी करण्यासाठी राष्ट्रवादीच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. उदयनराजे भोसले यांच्याविरोधात लोकसभेची पोटनिवडणूक लढण्यासाठी राष्ट्रवादीतून 4 दिग्गजांची नावे चर्चेत आहेत.

यामध्ये माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील नाव आघाडीवर असल्याची माहिती आहे. तसंच शशिकांत शिंदे, नितीन लक्ष्मणराव पाटील, अविनाश मोहिते यांची नावंही राष्ट्रवादीकडून चर्चेत आहेत. 

दरम्यान, खासदारकीचा राजीनामा दिल्यानंतर आगामी विधानसभा निवडणुकीसोबत साताऱ्याची पोटनिवडणूक घ्यावी. पोटनिवडणुकीत पराभव झाल्यास राज्यसभेवर नियुक्ती करावी, या अटी भाजप प्रवेशावेळी उदयनराजेंनी ठेवल्याची चर्चा आहे. 

महत्वाच्या बातम्या-