“तुमच्या खाजगी कार्यक्रमाची कधी CD निघाली तर तुमचे वांदे होतील…”

मुंबई | राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आज पक्षाच्या मेळाव्यानिमित्त उस्मानाबाद दौऱ्यावर होते. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे (NCP) मंत्री राजेश टोपे, धनंजय मुंडे (Dhananjay Munde) उपस्थित होते. धनंजय मुंडे यांनी यावेळी विविध मुद्यांवर भाष्य केलं.

जगाला खऱ्या लोकशाहीचं दर्शन कुणी घडवून दाखवलं असेल तर आदरणीय पवार साहेबांनी जगाला दाखवलं. 64 आमदारांचे मुख्यमंत्री झाले 54 आमदारांचे उपमुख्यमंत्री झाले. 44 आलेले मंत्री झाले आणि 105 वाले विरोधी पक्षात बसले आहेत, असं धनंजय मुंडे म्हणाले.

नगरपंचायत निवडणुकीत सर्वाधिक नगराध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे झाले आहेत मात्र भाजपच्या अंगातला माज अजूनही गेलेला नाही, अशी टीका धनंजय मुंडे यांनी केली आहे.

केंद्रीय तपास यंत्रणांकडून करण्यात येणाऱ्या कारवायांवरुन धनंजय मुंडे यांनी टीका केली. भाजपच्या अंगातला माज अजूनही गेलेला नाही, होत्याच नव्हतं केलं तरी भल्या भल्यांच्या मागे इन्कम टॅक्स काय ईडी काय सुरु आहे, असं मुंडे म्हणाले.

ईडीची तर इज्जत ठेवली नाही ईडी पेक्षा शेतकऱ्यांच्या खिशातल्या गणेश बिडी तिची किंमत जास्त आहे, असं म्हणत त्यांनी तपास यंत्रणा आणि भाजपवर टीका केली. आता धनंजय मुंडेंनी केलेल्या टीकेला भाजपने प्रत्युत्तर दिलं आहे.

भाजप नेते निलेश राणेंनी ट्विट करत धनंजय मुंडेंवर टीकास्त्र सोडलं आहे. धनंजय मुंडे आपण ED आणि BD ची चिंता करू नका. तुम्ही तुमच्या खाजगी कार्यक्रमाची कधी CD निघाली तर तुमचे वांदे होतील त्याची काळजी करा, असा बोचरी टीका निलेश राणेंनी धनंजय मुंडेंवर केलीये.

 

 

महत्वाच्या बातम्या- 

कोरोनातून बरे झालेल्यांनो काळजी घ्या; तज्ज्ञांनी दिली ही धक्कादायक माहिती 

“एकीकडे थोरलेपणाची अपेक्षा अन् दुसरीकडे वैराग्याच्या काळातही बगल में छुरी”

रशियन सैनिकाच्या कृत्याने खळबळ; युक्रेनमधून अत्यंत धक्कादायक माहिती समोर 

काळीज पिळवटून टाकणारा अपघात; बाईकला ट्रकची धडक, आठ महिन्यांच्या बाळाचा जागीच मृत्यू 

केंद्र सरकारचा सर्वसामान्यांना मोठा झटका?; ‘या’ वस्तूंवरील GST वाढणार