‘स्तनपान करतानाचा व्हिडीओ शेअर कर ना’ म्हणणाऱ्या युजरला नेहा धूपियाने चांगलेच खडेबोल सुनावले म्हणाली…

मुंबई |  सोशल मीडियावर बॉलिवूड अभिनेत्री आपल्या वैयक्तिक आयुष्यातील चाललेल्या घडामोडी आपल्या चाहत्यांसोबत सोशल मीडियाच्या माध्यमातून शेअर करत असतात.

तसेच अभिनेत्री त्यासंबंधीचे फोटो किंवा व्हिडीओही शेअर करत असतात. परंतू अनेकदा त्यांना कोणत्याना कोणत्या कारणावरून सोशल मीडियावर ट्रोल केलं जात. त्यावेळी काही अभिनेत्री त्या ट्रोलर्सना सगळ्याला इगनोर करतात. तर काही त्यांना धीटपणे उत्तरं देतात.

तसेच बॉलिवूड अभिनेत्री नेहा धूपिया आपल्या परखड व्यक्तिमत्वामुळे आळखली जाते. ती कोणत्याना कोणत्या विषयावरून सोशल मीडियावर चर्चेचा विषय असतेच. परंतू अशातच तिने एका ट्रोलरला चांगलचं खडसावलं आहे.

नेहा काही दिवसांपूर्वी एक फोटो आपल्या इंस्टाग्राम आकाऊंटवर शेअर केला होता. त्या फोटोमध्ये ती तिच्या मुलीला स्तनपान करताना दिसतं आहे. तर या फोटोवर एका युजरने अतिशय विचित्र कमेंट केली आहे. तो म्हणाला की, ‘तू तुझा ब्रेडफीड करतानाचा व्हिडीओ पोस्ट करू शकतेस का? नम्र विनंती’

ही कमेंट वाचून नेहा खूप भडकली आणि तिने या कमेंटचा स्क्रिनशॉट शेअर करत. त्या युजरला चांगलेच खडेबोल सुनावले आहेत. नेहा एक फोटो पोस्ट केला आहे. फोटो पोस्ट करताना तिने एक कॅप्शनही दिलं आहे.

मी नेहमी अशा अनेक कमेंट्सना टाळते किंवा त्यांच्याकडे दुर्लक्ष करते. पण हे जगासमोर आणणं महत्वाचं आहे. कारण यांच्यासारख्या लोकांमुळे आपल्याच मुलांना अंगावर दूध पाजणे हे स्त्रीजातीसाठी एक लाजिरवाणी गोष्ट बनते, असं तिने त्यात लिहिलं आहे.

इतकंच नाहीतर पुढे तिनं लिहिलं की, आई होणे हे काय आहे, हे फक्त तिलाच कळू शकते. मातृत्वासारखा दुसरा आनंद नाही. पण अनेकदा आपण सगळे एक आनंदी असलेलीच बाजू पाहतो. परंतू दुसरीकडे ती थकलेली असते. तिच्या अचानक खूप जबाबदरी पडते. आपल्या मुलाला कुठे आणि कसे स्तनपान करावे ही आईची मर्जी असली पाहिजे.

परंतू अनेकदा स्तनपानाकडे सेक्शुअल पद्धतीने पाहिले जाते. अशा असंवेदनशील कमेंट्समुळे, विचारांमुळेच आपल्या देशातील महिला मुलांना स्तनपान करताना अनकम्फर्टेबल असतात. आपल्याला आपल्या ब्रेस्टफीडला सेक्शुअलाइज करायला नको, असं नेहानी म्हटलं आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Neha Dhupia (@nehadhupia)

महत्वाच्या बातम्या-

जाणून घ्या! आता iPhone युजर्सला मास्क घालूनच अनलॉक करता…

माणसातला देवमाणूस! गर्भवती स्त्रीचा जीव वाचवण्यासाठी धडपड…

पती कामावर जाताच महिला प्रियकराला घरी बोलवायची अन्…,…

हनुमानाची जन्मकथा!, हनुमानाला मारुती का म्हणतात?, हनुमानाला…

पुणे पोलिसांकडून बड्या नगरसेविकेच्या मुलाला अटक, कारण ऐकून…