बॉयफ्रेंडच्या वजनावरून ट्रोल करणाऱ्यांना नेहा पेंडसेनं फटकारलं

मुंबई : अभिनेत्री नेहा पेंडसे हिने होणाऱ्या नवऱ्याच्या वजनावरुन ट्रोल करणाऱ्यांना फटकारलं आहे. एखाद्याच्या वजनावरुन हिणवण्याचा तुम्हाला काय अधिकार आहे? माझ्यासाठी कोण चांगलं आणि कोण वाईट हे ठरवणारे तुम्ही कोण?, असा सवाल नेहा पेंडसेना ट्रोलर्सना केला आहे.

नेहा पेंडसेने काही दिवसांपूर्वी बिजनेसमन शार्दुल बाययसोबत फोटो शेअर केले होते. त्या फोटोवरून काही जणांनी हाच मिळाला का? असा सवाल करत नेहाला ट्रोल करण्यास सुरूवात केली. यालाच नेहाने उत्तर दिलं आहे.

फक्त शार्दुलच नाही, तर मलासुद्धा कित्येक वेळा वाढत्या वजनावरुन चिडवलं जात होतं. प्रेक्षक म्हणून तुम्ही एखाद्या कलाकाराच्या लूक्सविषयी बोला. पण त्याला टार्गेट करु नका असं नेहाने बजावलं आहे.

तो माणूस मला किती आनंदात ठेवतो हे तुम्हाला माहिती आहे. माझ्यासाठी कोण चांगलं आणि कोण वाईट हे ठरवणारे तुम्ही कोण? काही जणांना लक्ष वेधून घेण्याची सवय असते, असं नेहाने म्हटलं आहे.

दरम्यान, एखाद्या व्यक्तीला शारीरीक, मानसिक किंवा आरोग्याचे त्रास असू शकतात. शार्दुल तर मनोरंजन विश्वातलाही नाही. तो व्यावसायिक आहे. त्याला ट्रोल करणं मुर्खपणाचं आहे, असं नेहा म्हणाली आहे.

 

View this post on Instagram

 

❤️

A post shared by NEHHA PENDSE (@nehhapendse) on

महत्वाच्या बातम्या-