काश्मीरमधील जनजीवन सुरळीत करा; सर्वोच्च न्यायालयाचे सरकारला आदेश

नवी दिल्ली : काश्मीरला विशेष राज्याचा दर्जा देणारं कलम 370 हटवल्यानंतर तिथली परिस्थिती तणावपूर्ण झाली आहे. राज्यात संचारबंदी असून अनेक नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आलं. कलम 370 हटवण्याच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या याचिकांवर सुनावणी करताना सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला फटकारलं आहे. काश्मीरमधील जनजीवन सुरळीत करा, असे आदेश सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला दिले आहेत.

काश्मीरमध्ये आता येण्या-जाण्यावरही बंदी घालणार का? असा प्रश्न सर्वोच्च न्यायालयानं केंद्र सरकारला विचारला आहे. काँग्रेसचे वरिष्ठ नेते गुलाम नबी आझाद यांना काश्मीरला जाण्यास परवानगी देण्यात आली आहे.

केंद्र सरकारनं काश्मीरबाबत अ‌ॅफिडेविट सादर करावं. लोकांना सर्व सेवा-सुविधा पुरवाव्या, असेही सर्वोच्च न्यायालयानं आदेश दिले आहेत.

राज्यातील परिस्थिती सुरळीत व्हावी. गरज पडली तर सरन्यायाधीश रंजन गोगोई स्वत: काश्मीर दौऱ्यावर जातील, असंही सर्वोच्च न्यायालयाने म्हटलं आहे. 

दरम्यान, काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि वरिष्ठ काँग्रेस नेते गुलाम नबी आझाद यांनी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. याचिकेत आझाद यांनी त्यांना काश्मीरमध्ये जाण्यास परवानगी मिळावी अशी मागणी केली होती. त्यांची ही मागणी सर्वोच्च न्यायालयानं मान्य केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या –