नवी दिल्ली | भारतीय बनावटीचे पहिले एअरक्राफ्ट (Aircraft) आयएनएस विक्रांत (INS Vikrant) याचे आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्त अनावरन झाले. 262 मीटर लांब आणि 62 मीटर रुंद या युद्धनौकेत 1600 चलत दलाची क्षमता आहे.
कोचिन येथे एका मोठ्या अलिशान समारंभात या युद्धनौकेचे लोकार्पन पार पडले. या नौकेचे वजन 45,000 टन आहे. आणि या युद्धनौकेच्या निर्मितीसाठी एकूण 20,000 कोटी रुपये खर्च आला.
विक्रातं ही देशातील सर्वात मोठी युद्धनौका आहे. यात MIG-26K फायटर जेट आणि हेलिकॉप्टर आहे. यावेळी बोलताना पंतप्रधान (Narendra Modi) म्हणाले, आयएनएस विक्रांत हे आत्मनिर्भर भारताचे उत्पन्न आहे.
जे देश स्वत: अवाढव्य युद्धनौका तयार करतात अशा देशांच्या यादीत आज भारत देश सामाविष्ट झाला आहे, या विक्रांतने देशाच्या आत्मविश्वासात मोठी भर घातली आहे, असे मोदी यावेळी म्हणाले.
यावेळी नौदलाच्या नवीन ध्वजाचे देखील अनावरन करण्यात आले. या ध्वजात डाव्या बाजूला देशाचा राष्ट्रध्वज (National Flag) तिरंगा आहे. तर उजव्या बाजूला निळ्या रंगात षटकोनात भारताचे राष्ट्रचिन्ह (National Emblem) आहे.
नौदलाच्या नवीन झेंड्याची प्रेरणा नरेंद्र मोदी यांनी मराठा सम्राज्याचे मोठे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज (Chatrapati Shivaji Maharaj) यांच्या राजमुद्रेवरुन घेतली आहे. शिवाजी महाराज्यांच्या दुरदृष्टीमुळे भारताला नौदल मिळाले, असे नौदल यावेळी म्हणाले.
नवीन नौदल ध्वज स्विकारुन भारताने त्याच्या छातीवरील गुलामीची प्रथा मोडून टाकली आहे, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषणादरम्यान म्हंटले.
या नौकेचे काम गेली दहा वर्षे सुरु होते. या नौकेच्या अनेक चाचण्या समुद्रात पार पडल्या. वर्तमानकाळात भारताकडे फक्त एकच एअरक्राफ्ट होती. ती म्हणजे विक्रमादित्य (Vikramaditya). जीची निर्मीती रशियाने केली होती.
पण आज आपल्याकडे आपल्या भारतीय बनावटीची युद्धनौका आहे. आयएनएस विक्रांतचे नाव 1971 च्या भारत – बांग्लादेश (Bharat Bangladesh) युद्धात मोठी कामगिरी करण्याऱ्या एका वीर सैनिकाच्या नावावरुन ठेवले आहे.
भारतीय नौदलाला विक्रांतच्या रुपात नवीन युद्धनौका मिळाली आहे. भारत येणाऱ्या काळात पूर्व आणि पश्चिम किनाऱ्यांवर सागरी सुरक्षेसाठी वाढ करणार आहे, असे देखील नौदल म्हणाले.
“मनीष सिसोदियांना अटक केली, तर आम्ही गुजरातमध्ये…” अरविंद केजरीवाल यांचा दावा