मुंबई | राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या कॅबिनेट बैठकीत राज्याच्या विविध विभागांसाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतलेत. आज बुधवार (दि. 27) रोजी ही बैठक पार पडली. यात शेतकरी आणि समाजिक आंदोलने याबाबत महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
या निर्णयात शेतकऱ्यांना सवलतीच्या दरात वीज उपलब्ध करून देण्याचा आणि सामाजिक आंदोलनातील नागरिकांवरचे गुन्हे मागे घेण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. तसेच नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना रुपये 50,000 अनुदान देण्याच्या निर्णयाचा देखील समावेश आहे.
शेतकऱ्यांना प्रोत्साहनपर लाभ देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सुमारे 14 लक्ष शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ मिळणार आहे. याकरिता 6 हजार कोटींच्या निधीची तरतुद करावी लागणार आहे. तसेच या योजनांच्या अंमलबजावणीसाठी 13.85 लक्ष शेतकऱ्यांना कर्जखात्यांसाठी सुमारे 5,722 कोटी इतका खर्च अपेक्षित आहे.
अतिउच्चदाब, उच्चदाब, लघुदाब आणि उपसा जलसिंचन योजनेतील शेतकऱ्यांना वीज दरात सवलत मिळणार आहे. तसेच राज्यातील सर्व दुय्यम न्यायालयातील सेवानिवृत्त अधिकाऱ्यांना वैदकीय खर्च मिळणार आहे. आणि विधी आणि न्याय विभागात सहसचिव पद नव्याने निर्माण करणार आहे.
लोणार सरोवराच्या जतन आणि विकास आराखड्यास मान्यता देण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आला आहे. राज्यात कायमस्वरुपी विनाअनुदानित तत्वावर 3 नवीन समाजकार्य महाविद्यालयांची स्थापना करण्यात येणार आहे. ठाणे जिल्ह्यातील भातसा पाटबंधारे प्रकल्पाला सुधारीत 1 हजार 492 कोटींची मान्यता देण्यात आली आहे.
हिंगोली जिल्ह्यात मा. बाळासाहेब ठाकरे (Balasaheb Thackeray) हरिद्रा (हळद) संशोधन व प्रशिक्षण केंद्र उभारण्यात येणार आहे. तसेच ग्रामिण भागांतील भूमिहीन शेतकऱ्यांना जमिनी देण्यात येणार आहे. 2022 पर्यंतच्या सर्व राजकीय व सामाजिक खटल्यामंध्ये अडकलेल्या लोकांची सूटका करण्यात येणार आहे. म्हणजे त्यांच्यावरील खटले मागे घेण्यात येणार आहेत.
महत्वाच्या बातम्या –
“बाळासाहेबांच्या पोटी आलात म्हणजे काही राजा झालात का?”
‘उद्धव ठाकरे दोन वेळा घरातून पळून गेले होते’, नारायण राणेंचा गौप्यस्फोट
“काय ते प्रश्न.. काय ती उत्तरं.. काय तो घरगुती कार्यक्रम.. एकदम ओक्के”
“उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच आहे”
“तुमच्यात कर्तृत्व नाहीये, तुम्ही मर्द नाहीत, शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका”