नवी दिल्ली | शिंदेच्या बंडानंतर शिवसेना पक्षाचं अस्तित्व धोक्यात आल्याचं दिसत आहे. त्यांना स्वत:च्याच आमदारांविरुद्ध कायदेशीर लढाई द्यावी लागत आहे. शिवसेनेतून अगोदर 40 पेक्षा जास्त आमदार परागंदा झाले. नंतर त्यांचे 12 खासदार आणि अनेक पदाधिकारी, नेते देखील शिवसेनेला राम राम करुन निघून गेले. त्यामुळे महाराष्ट्रातील एक मोठा पक्ष संपवण्यात भाजपला यश आलं असं म्हणावं लागेल. याच बंडाच्या पार्श्वभूमीवर आता भाजपचे नेते आणि ज्येष्ठ अभिनेते मिथून चक्रवर्ती (Mithun Chakraborty) यांनी मोठा दावा केला आहे.
तृणमूल काँग्रेस (TMC) पक्षाचे 38 आमदार सध्या भाजपच्या (BJP) संपर्कात आहेत. तसेच त्यातील 21 जण तर खुद्द माझ्या संपर्कात असल्याचं त्यांनी सांगितलं. त्यामुळे बंगालच्या (West Bengal) राजकराणात मोठी खळबळ उडाली आहे. आता त्यांचा हा दावा पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री आणि तृणमूलच्या सर्वेसर्वा ममता बॅनर्जी (Mamata Banerjee)यांनी फेटाळला आहे.
भाजपच्या बंगाल येथील कार्यालयात पत्रकार परिषदेत बोलताना चक्रवर्ती पत्रकारांना म्हणाले, मला तुम्हाला एक सनसनाटी बातमी द्यायची आहे. आणि त्यांनी हा गौप्यस्फोट केला. त्यावर सगळीकडे चर्चांना उधाण आलं आहे.
यावेळी चक्रवर्तींनी नुकत्याच अटक झालेल्या तृणमूलच्या मंत्र्यावर सुद्धा भाष्य केलं आहे. बंगालच्या तृणमूल काँग्रेस सरकारचे वाणिज्य आणि उद्योग मंत्री पार्थ चॅटर्जी (Parth Chaterjee) यांना अनुदानित (Aided) शाळांतील शिक्षक भरतीत कथित (SSC Scam) घोट्याळ्याप्रकरणी अटक झाली आहे. जर एखाद्या माणसाविरुद्ध कोणताही पुरावा नसेल तर त्याला जन्मभर सुखाने रहाता येईल, पण जर तो अपराधी असेल तर त्याला कोणीही वाचवू शकणार नाही, असं चक्रवर्ती म्हणालेत.
तृणमूल काँग्रेस पक्षाचे खासदार शंतनू सेन (Shantanu Sen) यांनी देखील मिथुन चक्रवर्तींचा दावा फेटाळला. त्यांनी त्यांचा हा दावा फेटाळत चक्रवर्तींवर खोचक टीका केली आहे. चक्रवर्तीं मागील काही दिवस दवाखान्यात होते. त्यामुळे त्यांच्यावर काहीतरी मानसिक परिणाम झाले आहेत. मी असल्या फालतू आणि बिनबुडाच्या दाव्यांवर भाष्य करण्यासाठी जास्त वेळ देऊ शकत नाही, असं सेन यावेळी म्हणालेत.
चक्रवर्तींचा दावा तृणमूलच्या नेत्यांनी जरी फेटाळला असला तरी त्यांच्या दाव्यात जर खरंच तथ्य असेल तर शिवसेनेपाठोपाठ आता देशोधडीला लागण्यासाठी तृणमूलचा नंबर लागतो का?, हे आगामी काळात पहावं लागेल.
महत्वाच्या बातम्या –
“बाळासाहेबांच्या पोटी आलात म्हणजे काही राजा झालात का?”
‘उद्धव ठाकरे दोन वेळा घरातून पळून गेले होते’, नारायण राणेंचा गौप्यस्फोट
“काय ते प्रश्न.. काय ती उत्तरं.. काय तो घरगुती कार्यक्रम.. एकदम ओक्के”
“उद्धव ठाकरे आणि शिवसेनेचं अस्तित्व भाजपमुळेच आहे”
“तुमच्यात कर्तृत्व नाहीये, तुम्ही मर्द नाहीत, शिवसेनेच्या बापाचा फोटो लावून भीक मागू नका”