‘…तर इमारत सील केली जाईल’; महापालिकेने जारी केली नवी नियमावली

मुंबई | राज्यात पुन्हा एकदा कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. मुंबईत मोठ्या प्रमाणात कोरोनाच्या फैलावाला सुरूवात झाली आहे.

मुंबईसारख्या शहरात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव बघता स्थानिक प्रशासनाने कठोर पाऊलं उचलायला सुरूवात केली आहे. मुंबईतील शाळा बंद करण्याचा निर्णय सर्वात आधी घेण्यात आला.

मुंबई महापालिकेने शाळा बंद करण्याचा निर्णय घेतल्यानंतर आता मुंबईतील रहिवासी इमारतींसाठी नवी नियमावली जारी केली आहे. कोरोना रूग्ण आढळले तर इमारत सील करण्याचा निर्णय महापालिकेकडून घेण्यात आला आहे.

रहिवासी इमारतींसाठी मुंबई महापालिकेची नवी नियमावली-

  1. इमारतीच्या अथवा विंगच्या एकूण क्षमतेच्या 20 टक्के रहिवासी कोरोनाबाधित आढळल्यास संपूर्ण इमारत अथवा विंग सील केली जाईल.
  2. आयसोलेशन अथवा होम क्वारंटाईन असलेल्या रूग्णांनी कोरोना नियमांचे काटेकोर पालन करणे अनिवार्य आहे.
  3. रूग्णांना कोरोनाची लक्षणे दिसून आल्यास त्यांना किमान 10 दिवस आयसोलेट राहणं बंधनकारक आहे.
  4. हायरिस्क कॉन्टॅक्टमध्ये असणाऱ्या नागरिकांनी 7 दिवस आयसोलेट राहणं बंधनकारक आहे.
  5. पालिकेचे आरोग्य अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना इमारतीच्या कमिटींनं सहकार्य करावं.
  6. इमारतीत कोरोना रूग्ण आढळल्यास रूग्ण आणि त्या कुटुंबाला अन्न, औषध तसेच दैनंदिन गरजेच्या वस्तूंचा पाठपुरावा केला जाईल याची काळजी सोसोयटीच्या कमिटीने घ्यावी.
  7. इमारती सीलमुक्त करण्याचा निर्णय वॉर्ड स्तरावर घेतला जाईल.

मुंबईत दिवसेंदिवस कोरोनाबाधितांच्या संख्येत लक्षणीय वाढ होत आहे. त्यामुळे कोरोना रूग्ण आढळून आल्यास इमारत सील करण्याचा निर्णय मुंबई महापालिकेने घेतला आहे.

कोरोना रूग्ण आढळल्यास त्या इमारतीत नियमांची कोटेकोर अंमलबजावणी करणं बंधनकारक करण्यात आलं आहे. ही नियमावली सोमवारी रात्री पासून लागू करण्यात आल्याचं महापालिकेनं स्पष्ट केलं आहे.

मुंबईतील कोरोनाची वाढती आकडेवारी सर्वांचीच चिंता वाढवणारी आहे. मुंबई कोरोनाच्या तिसऱ्या लाटेच्या उंबरठ्यावर असल्याची भीती तज्ज्ञांकडून व्यक्त केली जात आहे.

दरम्यान, मुंबईतील वाढत्या रूग्णसंख्येचा लहान मुलांवर परिणाम होऊ नये यासाठी खबरदारी म्हणून शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. ऑफलाईन शाळा बंद असल्या तरी ऑनलाईन वर्ग सुरू राहणार आहेत.

 

महत्वाच्या बातम्या-

केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; भरघोस पगारवाढ होण्याची शक्यता

2022 मालामाल करणार! तब्बल 45 कंपन्यांचे IPO बाजारात धडकणार

“एवढा निष्ठूर, निर्दयी व्यक्ती आमच्या देशाचा पंतप्रधान”

बापरे! कोरोनाचा कहर सुरूच, गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी समोर

बाॅक्स ऑफिसवर ‘पुष्पा’ची धमाल, तब्बल ‘इतक्या’ कोटींचा टप्पा पार