पुणे | माजी खासदार शिवाजी आढळराव पाटील यांनी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि राष्ट्रवादी काँग्रेसवर गंभीर आरोप केला आहे. महाविकास आघाडी आम्ही मान्य केली असून आम्ही आघाडीची तत्वं पाळत आहोत. परंतु शिवसेना संपवण्याचा डाव जिल्ह्यात सुरु आहे. आमचं अस्तित्व राहू द्या. आमची जास्त काहीही मागणी नाही. शिवसैनिकाला सुखाने जगू द्या असं त्यांनी म्हटलं आहे.
खेड तालुक्यातील पंचायत समितीचे सभापती 6 महिने जेलमध्ये राहावं लागलं. लांडेवाडी येथे होणारी बैलगाडा शर्यत रद्द करण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले, असं सांगित आढळरावांनी राष्ट्रवादीवर निशाणा साधला आहे.
बैलगाडा शर्यतीली परवानगी मिळाल्यानंतर पहिलीच बैलगाडा शर्यत आम्ही आयोजित केली म्हणून ती इतरांच्या डोळ्यात खूपली. त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी नाकारली. हे सगळं कारस्थान जिल्ह्यातील विरोधक आणि प्रशासनाने मिळून केलंय, असं शिवाजीराव आढळराव पाटील म्हणालेत.
शिवसैनिकांना जगू द्या, शिवसेनेला संपवण्याचा डाव सुरु आहे. आमचं अस्तित्व राहू द्या. आम्हाला मारु नका. गृहमंत्र्यांच्या जवळच्या कार्यकर्त्यांनी माझ्या कार्यकर्त्यांला जीवे मारण्याची धमकी दिली, असा आरोप त्यांनी केला आहे.
आम्ही कुणाच्या नादी लागत नाही. आम्हाला जगू द्या. वरिष्ठांच्या कानावर वेळोवेळी या गोष्टी सांगत आहोत, अशी खंतही शिवाजी आढळराव पाटील यांनी व्यक्त केली.
खेड पंचायत समितीच्या निवडणुकीत शिवसेना-राष्ट्रवादीमध्येही चांगलेच खटके उडाले होते. खेडचे राष्ट्रवादी काँग्रेस आमदारा विरोधात शिवसेना नेते आढळराव पाटील यांनी अनेकदा आरोप केले
यानंतर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी तर थेट राष्ट्रवादी काँग्रेसला इशारा दिला होता. अजितदादा, तुमच्या आमदाराला वेसण घाला नाहीतर पुढच्या वेळी महाविकास आघाडी राहो अथवा न राहो खेडमध्ये शिवसेनेचाच आमदार असेल, असं संजय राऊतांनी म्हटलेलं.
महत्त्वाच्या बातम्या
केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी गुड न्यूज; भरघोस पगारवाढ होण्याची शक्यता
बापरे! कोरोनाचा कहर सुरूच, गेल्या 24 तासातील धक्कादायक आकडेवारी समोर
मेट्रोबाबत एकनाथ शिंदे यांची मोठी घोषणा, म्हणाले…
मृत्यू जवळ आला होता तेवढ्यात… आईच्या एका कृतीनं मुलीला जीवदान!
कृष्ण प्रकाश यांच्या ‘त्या’ कारनाम्यावर गृहमंत्र्यांना हसू अनावर, म्हणाले…