मराठी भाषादिनी राज ठाकरेंची मोठी घोषणा; घेतला ‘हा’ निर्णय

मुंबई | मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचे पुत्र अमित ठाकरे यांच्या खांद्यावर नवी जबाबदारी सोपवण्यात आली आहे. मनसेने रविवारी पत्रक काढून याबाबतची घोषणा केली.

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या अध्यक्षपदी अमित राज ठाकरे (Amit Thackeray) यांची नियुक्ती करण्यात आली आहे. गेल्या काही काळापासून अमित ठाकरे हे राजकारणात चांगलेच सक्रिय झाले आहेत.

मध्यंतरी त्यांनी नाशिकचा दौराही केला होता. नाशिक महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीची धुराही अमित ठाकरे यांच्याकडे सोपवली जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, अमित ठाकरे अलीकडे मुंबईतील मनसे कार्यकर्त्यांच्या भेटीगाठी घेत आहेत

.पक्षाच्या अनेक शाखांमध्ये जाऊन त्यांना कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. अमित ठाकरे यांच्याभोवती असलेल्या वलयामुळे ते सातत्याने चर्चेचा विषयही असतात.

आता महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या रुपाने अमित ठाकरे यांना स्वत:ला सिद्ध करण्यासाठी आणखी एक व्यासपीठ मिळाले आहे. त्यामुळे आता अमित ठाकरे महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची धुरा कशाप्रकारे सांभाळतात, हे पाहावं लागेल.

दरम्यान, राज ठाकरे यांनीही आपल्या कारकिर्दीची सुरुवात ही शिवसेनेच्या अखिल भारतीय विद्यार्थी सेनेच्या माध्यमातून केली होती. राज ठाकरे यांनी सक्षमपणे या संघटनेचे नेतृत्त्व केले होते. त्यामुळे राज ठाकरे ह अल्पावधीत लोकप्रिय झाले होते.

महत्वाच्या बातम्या- 

तुमची लाडकी Wagon R येतेय नव्या रूपात; जाणून घ्या फिचर्स 

मोठी बातमी! दिशा सालियन बदनामी प्रकरणी राणे पिता-पुत्रांना झटका 

युक्रेनने तो प्रस्ताव फेटाळला; संतापलेल्या रशियानं केली मोठी घोषणा 

‘या’ भागात येत्या काही तासात पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा इशारा 

“शरद पवारांना 2024 ला सर्वात मोठी भेट द्यायची”