“तपास यंत्रणांचे काम फक्त महाराष्ट्रातच चालू आहे, बाकी संपूर्ण देश ओस पडलाय”

मुंबई | राज्यात केंद्रीय तपास यंत्रणांनी कारवाईचा सपाटा लावला आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळातील वातावरण तापलं आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून केंद्रीय यंत्रणांनी चौकशीचा ससेमीरा लावल्याचं पहायला मिळत आहे. यावरुनच राऊत आक्रमक झाल्याचं पहायला मिळत आहे.

मुंबई महापालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष आणि शिवसेना नेते संजय राऊत यांच्या घरी सलग तिसऱ्या दिवशी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केली.

गेल्या काही दिवसांपासून होणाऱ्या छापेमारीमुळे सत्ताधारी आणि विरोधी पक्षांमध्ये शाब्दिक चकमक पहायला मिळत आहे. सलग तिसऱ्या दिवशीही झालेल्या छापेमारीमुळे संजय राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला आहे.

मुंबई आणि महाराष्ट्र सर्वाधिक टॅक्स केंद्र सरकारला देते. त्यामुळे केंद्रीय तपास यंत्रणांना फक्त महाराष्ट्र आणि मुंबईत इन्कम आहे असे वाटतंय, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

जिथे भाजपची सत्ता आहे. त्या राज्यात इन्कम नाही आणि टॅक्सही नाही. त्यामुळे त्या राज्यांत सर्व काही अलबेल चाललंय. महाराष्ट्राच्या जनतेला कोण कशा प्रकारे त्रास देत आहार याची नोंद जनता घेत आहे, अशी खोचक टीका संजय राऊत यांनी केली आहे.

आता मुंबई महापालिका निवडणूक जवळ येत आहे. त्यामुळे तपास यंत्रणांचे काम महाराष्ट्रातच चालू आहे. बाकी संपूर्ण देश ओस पडला आहे, असंही राऊत म्हणाले.

महाविकास आघाडीतील नेते तपास यंत्रणांच्या रडारवर असल्याचं चित्र आहे. अशातच आता नवाब मलिक यांच्यानंतर आता शिवसेना नेते यशवंत जाधव यंत्रणेच्या रडारवर सापडले आहेत. यामुळे राजकीय वर्तुळात चांगलाच गोंधळ उडाला आहे.

महत्त्वाच्या बातम्या –

  मराठी भाषादिनी राज ठाकरेंची मोठी घोषणा; घेतला ‘हा’ निर्णय

तुमची लाडकी Wagon R येतेय नव्या रूपात; जाणून घ्या फिचर्स 

मोठी बातमी! दिशा सालियन बदनामी प्रकरणी राणे पिता-पुत्रांना झटका 

युक्रेनने तो प्रस्ताव फेटाळला; संतापलेल्या रशियानं केली मोठी घोषणा 

‘या’ भागात येत्या काही तासात पावसाची शक्यता; वाचा हवामान खात्याचा इशारा