टोलनाके होणार हद्दपार, टोलवसुलीसाठी नितीन गडकरींना आणली आहे नवीन योजना, जाणून घ्या उपयुक्त माहिती

नवी दिल्ली | देशीतील सर्व राष्ट्रीय महामार्गांवरील (National Highways) टोलनाके (Toll Plaza) बंद करुन त्याऐवजी टोलवसुलीसाठी नवीन कार्यप्रणाली आणणार असल्याची माहिती केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी (Nitin Gadkari) यांना दिली आहे.

राष्ट्रीय महामार्गांवरील टोलनाके बंद करुन आता स्वयंचलीत नंबर प्लेट रीडर (Automatic Number Plate) कॅमेरे आता टोल नाक्यांवर बसविण्यात येणार आहेत. अशी घोषणा परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी केली.

सदर प्रकल्पासाठी चाचणी सुरु असून त्यावर लवकरच अंमलबजावणी करणार असल्याची माहिती देखील त्यांनी यावेळी दिली आहे. चार चाकी वाहनांमध्ये कंपनीने नंबर बसविण्याचा निर्णय आम्ही 2019 साली घेतला होता.

त्यानुसार गेल्या चार वर्षात हे नंबर बसविण्यात आले आहेत. आता टोकनाके कालबाह्य करुन वाहनांवर स्वयंचलीत नंबर प्लेट रीडर कॅमेरा बसविण्यात येणार असल्याची माहिती देखील गडकरींना दिली आहे.

नंबप प्लेट स्कॅन होऊन त्याच्यासोबत संलग्न बँक खात्यातून हे पैसे वजा केले जातील. त्यामुळे टोलनाक्यावरील गर्दी आणि वाद टाळता येणार आहेत. या योजनेवर सध्या अंंमलबजावणी प्रक्रिया सुरु आहे.

तसेच कॅमेरा चुकविणाऱ्या चालकांवर कोणती कारवाई करायची आणि त्यावर कोणत्या प्रकारच्या शिक्षा असतील, याचे नियम आणि कायदे बनविण्याची प्रक्रिया देखील सुरु असल्याचे गडकरी यांनी यावेळी सांगितले.

महत्वाच्या बातम्या –

तरुणींच्या धर्मांतरासाठी ‘दरपत्रक’; आमदार नितेश राणेंनी विधानसभेत सादर केली खळबळजनक माहिती

“शरद पवारांना उशिरा कंठ फूटला, त्यांचे आणि राऊतांचे संबंध म्हणजे…”, अतुल भातखळकरांची पवारांवर टीका

एकनाथ शिंदेंनी फडणवीसांच्या मदतीने केली अजित पवारांवर कविता; वाचा सविस्तर कविता

“राज ठाकरे भाजपची तळी उचलतात आणि ते त्यांचे…” अंबादास दानवेंची मोठी टीका

‘आगामी लोकसभा निवडणुकीत अरविंद केजरीवाल विरुद्ध नरेंद्र मोदी असा संघर्ष असेल’