विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सत्ताधारी आणि विरोधकांत मारामारी; नेमके कारण जाणून घ्या

मुंबई | विधानसभेत पावसाळी अधिवेशन सुरु आहे. तेथे विरोधी पक्ष वेगवेगळ्या लक्षवेधी प्रश्नांवरुन सत्ताधारी पक्षाला धारेवर धरत आहेत. तर विधानभवनाच्या बाहेर सत्ताधारी आणि विरोधी पक्षांचे आमदार एकमेकावर तुटून पडले आहेत.

विधीमंडळाच्या पायऱ्यांवर विरोधी पक्षांच्या गद्दार आणि पन्नास खोके या घोषणांवरुन विधानसभेत पडसाद उमटत आहेत. कालच्या आपल्या भाषणात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी त्याबाबत विरोधी पक्षाला समज दिली.

तरी देखील आज विरोधी गटाकडून गाजर दाखवा आंदोलन करण्यात आले. त्यावरुन राष्ट्रवादीचे काँग्रेस पक्षाचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) आणि शिंदे गटातील आमदार महेश शिंदे (Mahesh Shinde) यांनी एकमेकाला धक्काबुक्की केली.

त्यांच्यात मोठी मारामारी आणि बाचाबाची झाली. सत्ताधाऱ्यांनी आम्हाला शिवीगाळ केल्याचा आरोप अमोल मिटकरी यांनी केला आहे. तसेच त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे याबाबत तक्रार देखील केली आहे.

आजचे कामकाज सुरु होण्यापूर्वी हे भांडण झाले. “पन्नास खोके एकदम ओके, खाऊन खाऊन माजलेत बोके” अशा घोषणा करण्यात आल्या. यावरुन विधीमंडळाच्या पायऱ्यावर दोन्हीकडील आमदार एकमेकावर धाऊन गेले.

अजित पवार (Ajit Pawar) यांनी यावर प्रतिक्रिया दिली. पन्नास खोके ही घोषणा त्यांच्या फार जिव्हारी लागली असून त्यांना राग अनावर झाला आणि हा प्रकार घडला, असे पवार विधानसभेत म्हणाले.

आम्ही यांचा इतिहास बाहेर काढला. कोरोनाचा काळ, सिंचन घोटाळा, नवाब मलिक, अनिल देशमुख यांची प्रकरणे बाहेर काढली म्हणून ते संतापले आहेत, असे प्रत्युत्तर शिंदे गटाचे शिवसेना आमदार भरत गोगावले (Bharat Gogawale) यांनी दिले.

महत्वाच्या बातम्या – 

टोलनाके होणार हद्दपार, टोलवसुलीसाठी नितीन गडकरींना आणली आहे नवीन योजना, जाणून घ्या उपयुक्त माहिती

तरुणींच्या धर्मांतरासाठी ‘दरपत्रक’; आमदार नितेश राणेंनी विधानसभेत सादर केली खळबळजनक माहिती

“शरद पवारांना उशिरा कंठ फूटला, त्यांचे आणि राऊतांचे संबंध म्हणजे…”, अतुल भातखळकरांची पवारांवर टीका

एकनाथ शिंदेंनी फडणवीसांच्या मदतीने केली अजित पवारांवर कविता; वाचा सविस्तर कविता

“राज ठाकरे भाजपची तळी उचलतात आणि ते त्यांचे…” अंबादास दानवेंची मोठी टीका