अ.टकेची शक्यता दिसताच कंगनाची हायकोर्टात धाव; ‘ती’ तक्रार मागे घेण्यासाठी याचिका

मुंबई | सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्युनंतर अभिनेत्री कंगना राणावत सतत चर्चेत आहे. कंगनाने बॉलीवूड इंडस्ट्री विरुद्ध जणू बंडच पुकारलं आहे. कंगनाने इंडस्ट्रीत पडद्याआड घडणाऱ्या अनेक गोष्टींचा खुलासा केला आहे. तसेच कंगनाने अलीकडच्या काळात अनेक वा.दग्रस्त विधानं देखील केली आहेत.

बॉलीवूड मधील नेपो.टीझमचा मुद्दा असो किंवा महाराष्ट्र सरकार, कंगना नेहमीच उघडपणे आ.रोप करत असते. कंगना नेहमी ट्वीटरवरून अनेकांवर निशाणा साधत असते. मात्र, आता एक ट्वीट कंगनाच्या चांगलंच अंगलट आलं आहे. कंगना राणावतनं केलेल्या एका ट्वीटमुळे तिला आणि तिची बहिण रंगोली हिला अ.टक होऊ शकते.

कंगना रानावातनं काही दिवसांपूर्वी धार्मिक तेढ पसरवनारं वक्तव्य केलं होतं. बॉलीवूड इंडस्ट्रीमध्ये मुस्लीम समाजाचं प्राबल्य आहे. मी झाशीची राणी हा चित्रपट बनवून इंडस्ट्रीतील मुस्लीम प्राबल्य मोडून काढलं, असं कंगना काही दिवसांपूर्वी बरळली होती. कंगनाच्या याच वक्तव्याविरोधात वांद्रे कोर्टात कंगनाविरुद्ध याचिका दाखल केली होती.

कंगना राणावत हिंदू मुस्लीम समुदायात धार्मिक तेढ वाढवण्याचं काम करत आहे. कंगना धर्मावरून अनेकवेळा वा.दग्रस्त आणि आक्षेपार्ह्य ट्वीट करत आहे. त्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होत असल्याचा आरोप कंगनावर करण्यात आला होता. यानंतर कोर्टाच्या आदेशानुसार कंगनावर गु.न्हा दाखल करण्यात आला होता.

मात्र, न्यायदं.डाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार दाखल केलेली एफआयआर रद्द करण्यासाठी कंगनाने हायकोर्टात धाव घेतली आहे. यासाठी कंगनाने मुंबई हायकोर्टात याचिका दाखल करत एफआयआर रद्द करण्याची मागणी केली आहे.

मुंबई हायकोर्ट येत्या 26 तारखेला याप्रकरणी सुनावणी करेल, अशी माहिती मिळाली आहे. 26 नोव्हेंबरच्या या सुनावणीकडे अनेकांचं लक्ष लागून आहे. तसेच कंगनाला अ.टक होणार का?, हे पाहणं देखील आता महत्वाचं ठरणार आहे.

याप्रकरणी चौकशीसाठी पोलिसांनी कंगनाला दोनवेळा समन्स बजावला होता. मात्र, कंगना दोन्हीवेळी चौकशीसाठी हजर झाली नाही. कंगनाला काही दिवसांपूर्वीच मुंबई पोलिसांनी तिसऱ्यावेळी देखील समन्स बजावला होता.

दरम्यान, कंगना राणावत सध्या ‘थलायवी’ सिनेमाच्या शूटिंगमध्ये व्यस्थ आहे. कंगना येत्या काही दिवसांतच आपल्याला थलायवी या चित्रपटात हटके भूमिकेत पाहायला मिळणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

धक्कादायक! से.क्सची इच्छा वाढवण्यासाठी या अभिनेत्री ड्र.ग्ज घेतात?

भाजपला मोठा धक्का! भाजपला रामराम ठोकत ‘हे’ माजी केंद्र मंत्री उद्या राष्ट्रवादीत प्रवेश करणार

अनेक दिग्गज अभिनेत्रींना मागे टाकत ‘ही’ अभिनेत्री झाली भारताची ‘नॅशनल क्रश’!

तरुणांना मोठा धक्का! ‘हे’ राज्य सरकार सर्वच आॅनलाईन गेम्सची हाकलपट्टी करणार

फायनल अल्टीमेटलाही कंगना अनुपस्थित? आता मुंबई पोलीस कंगनाला अ.टक करणार?