निर्भया बलात्कार प्रकरणातील नराधमांच्या फाशीला स्थगिती

नवी दिल्ली | 2012 साली झालेल्या दिल्लीत निर्भया बलात्कार प्रकरणी सारा देश रस्त्यावर उतरुन आंदोलन करत होता. आरोपींच्या फाशीची मागणी करत होता. चारही आरोपींना फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र आता त्यांच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्यात आली आहे.

यापूर्वी दिल्लीच्या पटियाला हाऊस न्यायालयाने पुढच्या आदेशापर्यंत दोषींच्या फाशीला स्थगिती देण्याचे आदेश दिले आहेत. आरोपी मुकेश कुमारची याचिका फेटाळल्यानंतर 1 फेब्रुवारी रोजी आरोपींना फाशीची शिक्षा देण्याचे आदेश दिले होते. मात्र या नराधमांच्या फाशीची शिक्षा उद्या टळली आहे.

दिल्लीच्या पटियाला न्यायालयाने पुढचे आदेश देईपर्यंत आरोपींच्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती दिली आहे. मुकेश कुमारने राष्ट्रपतींकडे दयेचा अर्ज फेटाळल्यानंतर त्याने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र सर्वोच्च न्यायालयानेही त्याची याचिका फेटाळली.

दरम्यान, आरोपींना फाशीची शिक्षा होईपर्यंत मी माझा लढा सुरु ठेवणार असल्याचं निर्भयाच्या आईने सांगितलं आहे.

महत्वाच्या बातम्या-

-प्रेमी युगलाला मारहाणीची घटना महाराष्ट्राला काळीमा फासणारी; सुप्रिया सुळे संतापल्या

-राज ठाकरेंचं विद्युत आयोगाला पत्र; बेस्टच्या वीज दरवाढीवर मनसेचा आक्षेप

-रत्नागिरीच्या जिल्हा परिषद शाळांच्या गॅदरिंगमध्ये ‘आयटम साँग’वर बंदी

-“मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी आपण लढा देणार”

-“अरे काय पाहिजे सांगा, मी द्यायलाच बसलोय”