पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी अर्थसंकल्पात केली तब्बल 600 कोटींची तरतूद!

नवी दिल्ली | पंतप्रधान हा सर्वोच्च कार्यकारी प्रमुख असतो. देशातील सर्वात महत्वाची व्यक्ती म्हणून त्यांच्या सुरक्षेसाठी सर्वोच्च सुरक्षा नियमांचं पालन केलं जातं. त्यासाठी जगातील अत्याधुनिक यंत्रणा वापरली जाते.

पंतप्रधानांच्या सुरक्षेसाठी खास पथक तयार करण्यात आलं होतं. त्यालाच स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप असंही म्हणतात. यासाठी यावर्षी बजेटमध्ये तब्बल 600 कोटींची तरतूद करण्यात आलीय.

स्वर्गीय इंदिरा गांधी, राजीव गांधी या दोन माजी पंतप्रधानांची हत्या झाल्यानंतर पंतप्रधानांच्या सुरक्षेत अभूतपूर्व वाढ झाली आहे.

दरम्यान, मागच्या वर्षी 540 कोटींची तरतूद करण्यात आली. पंतप्रधानांचे देशविदेशातील दौरे, त्यांचं निवासस्थान, त्यांचं कुटुंबीय या सगळ्यांना असलेला धोका लक्षात घेऊन एसपीजीचं संरक्षण कव्हर दिलं जातं.

महत्वाच्या बातम्या-

-“शिवसेनेचे मंत्री कारकूना सारखे टेबलवरील पेन आणि फाईल उचलण्याचं काम करत असतात”

-नागरीकत्व सिद्धं करणं हे केवळ मुस्लिमांनाच नाही, तर हिंदूंनाही जड जाणार- उद्धव ठाकरे

-“उद्धव ठाकरेंना फिरायला वेळ आहे…… दखल घ्या नाहीतर मातोश्रीबाहेर आत्मदहन करू!”

-“दिल्लीत भाजपला 40 पेक्षा अधिक जागा मिळतील”

-सोनिया गांधी यांची प्रकृती बिघडली; रूग्णालयात दाखल