जगप्रसिद्ध ‘फोर्ब्स’मधून मोदींवर टीकेची झोड; अर्थव्यवस्था, बेरोजगारी, उद्योग यावरून लक्ष्य

मुंबई |  ‘मोदी शूड स्पेण्ड मोअर टाइम अ‌ॅट होम’ हा लेख फोर्ब्सच्या वेबसाईटवर प्रसिद्ध झाला आहे. या लेखातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर भारताच्या ढासळलेल्या अर्थव्यवस्थेवरून कडाडून टीका करण्यात आली आहे. मोदींनी जगभर दौरे करण्यापेक्षा देशात थांबून अर्थव्यवस्था सावरावी, असं बोचरी टीका ‘मोदी शूड स्पेण्ड मोअर टाइम अ‌ॅट होम’ या लेखातून केली आहे.

एकीकडे मोदी रशियापासून अमेरिकेपर्यंत शक्तीशाली देशांच्या राष्ट्रप्रमुखांच्या भेटी घेत आहेत तर दुसरीकडे भारताची अर्थव्यवस्था दिवसेंदिवस ढासळत चालली आहे. गेल्या काही दिवसांपासून जीडीपी 8 टक्क्यांहून 5 टक्क्यांपर्यंत घसरला आहे, असं लेखात म्हटलं आहे.

मोदी सत्तेत आल्यापासून आपल्या आयुष्यात सकारात्मक फरक पडलेला नाही असं अनेक भारतीयांनी म्हटलं आहे. त्यातही शहरांपेक्षा ग्रामीण भागात परिस्थिती अधिक गंभीर आहे, असं निरिक्षण या लेखामध्ये नोंदवण्यात आलं आहे.

देशातील नागरिकांमध्ये धार्मिक आणि प्रादेशिक वादावरुन फूट निर्माण झाली आहे. भारतासारखी विविधता असलेल्या देशामध्ये अशा पद्धतीने काम करणे योग्य नाही, अशी टिका पॅनोस यांनी या लेखात केली आहे.

दरम्यान, भारतात सगळं काही ठीक आहे, हे जगाला कितीही ओरडून सांगितलं तरी सद्यपरिस्थिती बदलणार नाही, असंही लेखात म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या-