“मला मानसिक समाधान मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरू असेल”

मुंबई : अभिनेता नाना पाटेकर यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप केलेली अभिनेत्री तनुश्री दत्ता पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. मला न्याय मिळत नाही तोपर्यंत माझा लढा सुरू असेल, असं म्हणत तनुश्री दत्ताने पुन्हा एकदा नाना पाटेकरांवर निशाणा साधला आहे.

तनुश्री दत्त नुकतीच भारतात परतली आहे. येताच तिने पुन्हा एकदा मी मटू मोहिमेवर तिचं मत व्यक्त केलं आहे. या प्रकरणात आपल्याला न्याय नक्की मिळेल, असा विश्वास तनुश्री दत्ताने व्यक्त केला आहे.

न्याय नेहमीच होतो. प्रत्येकाच्या मनात न्यायाची वेगळी व्याख्या असते, पण न्याय मिळणे हा निसर्गाचा नियम आहे. अन्यायाचा अंत होणं आणि न्याय मिळणं हे निसर्गत: कायम होत आलंय, असं तनुश्री दत्ताने म्हटलंय.

मी माझी केस अजूनही बंद केलेली नाही. जोपर्यंत मला मानसिक समाधान आणि न्याय मिळत नाही तोपर्यंत माझी ही लढाई मी कायम लढत राहीन, असंही तनुश्री म्हणाली आहे.

दरम्यान, एखाद्या मुलीला स्वत:बद्दल अशा खोट्या गोष्टी पसरवून काय मिळणार? असा सवालही तिला विरोध करणाऱ्या प्रत्येकाला तिनं यावेळी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या-