मराठा समाज अडचणीत असतो तेव्हा हे काही बोलत नाहीत निलेश राणेंचं सुप्रिया सुळेंना उत्तर

मुुंबई | शिवप्रतिष्ठानचे संभाजी  भिडे यांच्या सांगली बंदच्या हाकेमागे मोठं राजकीय षडयंत्र असल्याचं म्हणत राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजपवर निशाणा साधला होता. यावरुन भाजप नेते आणि माजी खासदार निलेश राणे यांनी टीका केली आहे.

मराठा समाज अडचणीत असतो तेव्हा हे काही बोलत पण नाही आणि काही करत पण नाही. पण कोण समाजाला मदत करतो तर त्यात ह्यांना राजकारण दिसतं, असं म्हणत निलेश राणे यांनी निशाणा साधला आहे. त्यांनी यासंदर्भात ट्विट केलं आहे.

सांगली बंदमागे राजकीय षडयंत्र असल्याचं मला वाटतं. मुख्यमंत्री सांगलीच्या दौऱ्यावर असताना असा बंद चुकीचा आहे. ज्या छत्रपतींनी आपल्याला कष्ट करायला शिकविले, तिथे बंद करणे चुकीचं आहे, असं सुप्रिया सुळे यांनी म्हटलं होतं.

दरम्यान, संजय राऊत यांनी उदयनराजे भोसले यांच्याविषयी केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे. भिडे यांनी आज सांगली बंदची हाक दिली आहे.

 

महत्वाच्या बातम्या- 

लग्नाची ‘दिशा’ काय म्हणतीय? अवधूतच्या प्रश्नावर आदित्य क्लीनबोल्ड!

भाजप प्रदेश उपाध्यक्ष आणि अजित पवार यांंची पुण्यात भेट; चर्चांना उधाण.

रोहित पवारांनी लावला थेट मोदींना फोन; म्हणाले, ‘मेरा नाम तो आपने सुना ही होगा…!’

बाळासाहेब ठाकरे हाजी मस्तानचे चांगले मित्र होते; डाॅनच्या पुत्राचा दावा

गांधी-आंबेडकर-सावरकरांचा इतिहास सांगणं गुन्हा आहे काय?; फडणवीसांचं मुख्यमंत्र्यांना पत्र