देशाच्या माजी पंतप्रधानांचा मुलगा भाजपच्या जाळ्यात; लवकरच प्रवेश??

नवी दिल्ली |  भारतीय जनता पक्षामध्ये सध्या इनकमिंग जोरात चालू आहे. देशाचे माजी पंतप्रधान चंद्रशेखर यांचे पुत्र आणि राज्यसभा खासदार नीरज चंद्रशेखर हेसुद्धा भाजपच्या प्रेमात आहेत. आणि लवकरच ते भाजपमध्ये प्रवेश करतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे.

समाजवादी पक्षाचे खासदार नीरज चंद्रशेखर यांनी आपल्या राज्यसभा सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांच्याबरोबर त्यांची एक बैठक झाली होती. यानंतर त्यांनी हा निर्णय घेतला आहे.

उत्तर प्रदेशातील बलियामातून लोकसभा निवडणूक लढण्याची त्यांची इच्छा होती. मात्र समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांनी त्यांना उमेदवारी नाकारली. तेव्हापासून चंद्रशेखर चांगलेच नाराज आहेत.

अमित शहा यांच्या भेटीनंतर ते पंतप्रधान नरेंद्र यांना भेटू शकतात. पंतप्रधान मोदींना भेटल्यानंतर आणि त्यांच्याशी बातचित केल्यानंतर ते भाजपात प्रवेश करू शकतात, अशी माहिती कळतीये.

लोकसभा निवडणुकीवेळी तिकीट नाकारल्याने त्यांनी सपाचा प्रचारसुद्धा केला नाही. तेव्हापासूनच ते भाजपच्या संपर्कात असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, प्रादेशिक पक्षातले अनेक नेते सध्या भाजप प्रवेश करताना दिसून येत आहेत. महाराष्ट्र, गोवा, कर्नाटक ही त्यांची मुर्तीमंत उदाहरणे आहेत.